भारतीय महिलांचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

By admin | Published: August 17, 2014 01:30 AM2014-08-17T01:30:32+5:302014-08-17T01:30:32+5:30

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करीत इंग्लंडला एकमेव कसोटीत सहा विकेट्सने धूळ चारली.

Indian women's historic win over England | भारतीय महिलांचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

भारतीय महिलांचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

Next
>वोर्म्सली :  मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने  ऐतिहासिक कामगिरी करीत इंग्लंडला एकमेव कसोटीत सहा विकेट्सने धूळ चारली.
चार दिवसांचा हा सामना जिंकण्यासाठी भारताला 181 धावांचे लक्ष्य मिळाले होते. चार विकेट्सच्या मोबदल्यात 119वरून पुढे खेळताना कर्णधार मितालीने जबाबदारी उचलली. शिखा पांडेसोबत मितालीने पाचव्या विकेटसाठी 68 धावांची नाबाद भागीदारी केली आणि आठ वर्षानंतर इंग्लंडविरुद्धची मालिका खिशात घातली. भारताने 95.3 षटकांत 4 बाद 183 धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. याआधी 2क्क्6 साली भारताने इंग्लंड दौ:यात 1-क् असा विजय मिळविला होता.   विजयाची नायिका बनलेल्या मितालीने  157 चेंडूंना टोलवून चार चौकारांसह नाबाद 5क् तर शिखाने 1क्6 चेंडूंत  नाबाद 28 धावा केल्या.  
 
संक्षिप्त धावफलक
च्इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद 92 धावा; दुसरा डाव - सर्वबाद 2क्2 धावा (जे गन 62*, एस टेलर 4क्; गोस्वामी 4-48, के क्रॉस 3-42 ). भारत (पहिला डाव) सर्वबाद 114; दुसरा डाव - 4 बाद 183 धावा (स्मृती मंधना 51, मिताली राज 5क्*)

Web Title: Indian women's historic win over England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.