भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद
By admin | Published: November 5, 2016 06:54 PM2016-11-05T18:54:52+5:302016-11-05T19:29:25+5:30
भारतीय आणि चीन महिला हॉकी संघांदरम्यान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवण्यात आला. भारताने चीनचा 2-1 ने पराभव केला असून विजेतेपद मिळवलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मलेशिया, दि. 5 - दिपिका ठाकूरने शेवटच्या मिनिटावर केलेल्या निर्णायक गोलमुळे भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवल आहे. भारत आणि चीन महिला हॉकी संघांदरम्यान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवण्यात आला. भारताने चीनचा 2-1 ने पराभव करत पहिल्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं आहे. या विजयासोबत भारताने लीगमधील शेवटच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. महिला हॉकी संघाअगोदर पुरुष संघानेही गतविजेता आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान ३-२ असे परतावून दिमाखात आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने उत्तम आणि संतुलित खेळ दाखवला. सामन्याच्या सुरुवातीला भारताने पहिला क्वार्टर संपताना पेनाल्टी कॉर्नरचा फायदा उचलत एका गोलसहित चीनवर वर्चस्व साधलं. दुसरा क्वार्टर संपेपर्यंत भारताने 1-0 ने लीड कायम ठेवली.
FT: India are crowned Champions of the 4th Women's #ACT2016 after scoring the winner in the final minute of the game! #INDvCHN#IndiaKaGamepic.twitter.com/NfF8mHDG1l
— Hockey India (@TheHockeyIndia) November 5, 2016
तिसरी क्वार्टर संपेपर्यंत चीनने सामन्यात पुनरागमन करत 1-1 ने बरोबरी केली. चीनी खेळाडू चोंगने 44व्या मिनिटाला गोल करत भारताची बरोबरी केली. पण शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने विजयासाठी संघर्ष केला. याचा फायदा झाला आणि शेवटच्या मिनिटाला दिपिकाने गोल करत भारताला विजेतेपद मिळवून दिलं. 2013 मध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता तर 2010 मध्ये तिस-या स्थानी राहिला होता.