भारतीय महिला हॉकी संघ विजयी
By admin | Published: March 3, 2017 12:23 AM2017-03-03T00:23:28+5:302017-03-03T00:23:28+5:30
भारतीय महिला संघाने गुरुवारी येथे पहिल्या हॉकी कसोटीत बेलारूसचा ५-१ गोलफरकाने धुव्वा उडवला.
भोपाळ : भारतीय महिला संघाने गुरुवारी येथे पहिल्या हॉकी कसोटीत बेलारूसचा ५-१ गोलफरकाने धुव्वा उडवला.
गेल्यावर्षी महिलांची आशियाई चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिला सामना होता. त्यात त्यांनी ११व्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत आघाडी मिळवली. चारच मिनिटांनंतरनवज्योत कौरच्या सुरेख मैदानी गोलच्या बळावर पहिल्या ब्रेकमध्ये भारताने २-० अशी आघाडी दुप्पट केली. बेलारूसने दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये सुरेख बचावात्मक खेळ केला; परंतु पूनम बार्लाने २९ व्या मिनिटाला गोल करीत भारतीय संघाची आघाडी ३-० वर पोहोचवली. स्वीटलाना बाहुशेविचने पाहुण्यांसाठी ३७ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. त्यामुळे तिसऱ्या क्वॉर्टरपर्यंत भारत ३-१ गोलने आघाडीवर होता.
भारतीय संघाने चौथ्या क्वॉर्टरमध्ये जोरदार मुसंडी मारली आणि दोन गोल केले. कर्णधार दीप ग्रेस एक्का (५७ व्या मिनिट) आणि गुरजित कौर (६० वा मिनिट) यांनी पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले.