भारतीय महिला हॉकी संघाची विजयी सलामी
By admin | Published: July 25, 2014 01:19 AM2014-07-25T01:19:17+5:302014-07-25T01:19:17+5:30
भारतीय महिला हॉकी संघाने साखळी फेरीत ‘अ’ गटात गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत कॅनडाचा 4-2 ने पराभव करीत 2क् व्या राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
Next
ग्लास्गो : जसप्रीत कौरने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने साखळी फेरीत ‘अ’ गटात गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत कॅनडाचा 4-2 ने पराभव करीत 2क् व्या राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
भारताने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले. भारतातर्फे राणी रामपाल (22 वे मिनिट), पूनम राणी (3क् वे मिनिट) आणि जसप्रीतने (38 व 54 वे मिनिट) गोल नोंदविले तर कॅनडातर्फे ब्रेनी स्टेयर्स व कार्ली जोहान्सन यांनी प्रत्येकी एक गोल केला. कॅनडाला सुरुवातीला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. भारताला त्यानंतर लगेच दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर त्यांना गोल नोंदविता आला नाही. कॅनडाला मिळालेल्या दुस:या पेनल्टी कॉर्नरवर जोहान्सनने गोल नोंदविला. त्यानंतर जसप्रीतने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताचा विजय निश्चित केला. दरम्यान, ‘अ’ गटात आज खेळल्या गेलेल्या अन्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगो संघाचा 16-क् ने धुव्वा उडविला तर ‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाने मलेशियाचा 4-क् ने तर इंग्लंडने वेल्सचा 2-क् ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
भारतातर्फे राणी रामपाल व कारकीर्दीतील 1क्क् वा सामना खेळणारी वंदना कटारिया यांनी अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले. 22 व्या मिनिटाला वंदनाने शानदार चढाई केली त्यावर रामपालने गोल नोंदवित भारताचे खाते उघडले. स्टयर्सने त्यानंतर चार मिनिटांनी गोल नोंदवित कॅनडाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. भारताला त्यानंतर तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर पूनम राणीने गोल नोंदवित संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर सुरुवातीलाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर जसप्रीतने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.