Tokyo Olympic: अन्नू राणी... शेतात शिकली भालाफेक करायला अन् आता पटकावलं टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 11:17 AM2021-07-01T11:17:34+5:302021-07-01T11:18:51+5:30

मेरठ येथील भालाफेकपटू अन्नू राणी ( Annu Rani) हिनं जागतिक अॅथलेटिक्स रँकिंग सिस्टमच्या आधारावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं.

The Indian Women’s Javelin Throw National Record holder Annu Rani secured her spot at the Tokyo Olympic Games via the World Rankings | Tokyo Olympic: अन्नू राणी... शेतात शिकली भालाफेक करायला अन् आता पटकावलं टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट

Tokyo Olympic: अन्नू राणी... शेतात शिकली भालाफेक करायला अन् आता पटकावलं टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट

googlenewsNext

मेरठ येथील भालाफेकपटू अन्नू राणी ( Annu Rani) हिनं जागतिक अॅथलेटिक्स रँकिंग सिस्टमच्या आधारावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. अन्नू राणीला ऑलिम्पिक तिकीट मिळाल्यानं तिचं गाव बहादुरपूर येथे आनंदाचं वातावरण आहे. १२ वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक समस्येवर मात करून अन्नूनं सातत्यानं दमदार कामगिरी केली आणि अखेर तिचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तिनं नुकतंच ६३.२४ मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले होते. पण, ऑलिम्पिक पात्रतेसाठीचे अंतर .७७ मीटरनं ती हुकली होती. जागतिक क्रमवारीच्या आधारावर तिला ऑलिम्पिक तिकीट मिळाले आहे. 


अन्नू राणीनं २०१४च्या आशियाई स्पर्धेत कांस्य, २०१५च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य, २०१७च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिनं आठ वेळा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.  

शेतकरी अमरपाल सिंह यांच्या घरी जन्मलेली अन्नू ही पाच बहिण-भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. अमरपाल हे स्वतः गोळाफेकपटू होते आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत अन्नूनं खेळाच्या मैदानावर पाऊल ठेवले. सुरुवातीला ती भालाफेकसोबतच गोळाफेकही करायची, परंतु तिनं अखेर भालाफेक करण्याचा निर्णय घेतला. वडिलांना तिला दीड लाखांचा भाला घेऊन देता आला नव्हता. अन्नूनं २५०० रुपयाचा पहिला भाला खरेदी केला. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिले नाही. शेतात ती भालाफेकीचा सराव करायची. 

Web Title: The Indian Women’s Javelin Throw National Record holder Annu Rani secured her spot at the Tokyo Olympic Games via the World Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.