भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 04:27 AM2018-05-17T04:27:15+5:302018-05-17T04:27:15+5:30

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत बुधवारी चीनवर ३-१ ने मात करीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

Indian women's second consecutive win | भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

Next

डोंघाय सिटी (द. कोरिया) : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत बुधवारी चीनवर ३-१ ने मात करीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
भारताकडून वंदना कटारियाने चौथ्या आणि ११ व्या मिनिटाला गोल केला. वंदनाच्या दोन गोलशिवाय गुरजित कौर हिने ५९ व्या मिनिटाला गोल नोंदविला. आठव्या स्थानावर असलेल्या चीनकडून एकमेव गोल वेन डान हिने १५ व्या मिनिटाला केला. दोन विजयांसह विश्व क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेला भारतीय संघ पुढील सामना मलेशियाविरुद्ध खेळणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने जपानवर ४-१ असा विजय नोंदविला होता.
या स्पर्धेद्वारे मारिन शोर्ड यांनी महिला संघाच्या मुख्य कोचपदाची सूत्रे स्वीकारली. ते गेली सात महिने पुरुष संघाचे कोच होते. गोल्ड कोस्ट राष्टÑकुल स्पर्धेत भारतीय पुरुष संघ पदकापासून वंचित राहताच, त्यांची उचलबांगडी करण्यात येऊन महिला संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian women's second consecutive win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.