टी-२०च्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय

By admin | Published: January 26, 2016 01:43 PM2016-01-26T13:43:56+5:302016-01-26T13:56:45+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला टी-२० टूर्नामेंटचा पहिलाच सामना भारताने जिंकला असून टी-२० प्रकारात झोकात पदार्पण केले आहे

Indian women's team beat Australia in T20 International debut | टी-२०च्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय

टी-२०च्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
अॅडलेड (ऑस्ट्रेलिया), दि. २६ - आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला टी-२० टूर्नामेंटचा पहिलाच सामना भारताने जिंकला असून टी-२० प्रकारात झोकात पदार्पण केले आहे. नोणेफेक जिंकल्यावर भारतीय कप्तान मिथाली राजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था १७ धावात २ बाद करत गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला १४० धावांमध्ये रोखल्यानंतर भारतीय संघाने १८.४ षटकांमध्ये ५ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा आरामात पराभव केला. एकूण तीन सामन्यांची ही मालिका असून दुसरा सामना मेलबर्नला तर तिसरा सिडनीला होणार आहे.
सामनावीराचा किताब मिळालेल्या हरमनप्रीत कौरने ३१ चेंडूंमध्ये ४६ केल्या तर स्मृती मंधनाने २९ व वेदा कृष्णमूर्तीने ३६ धावा करत विजय सोपा केला.