बॅडमिंटन, हॉकी, अॅथलेटिक्समध्ये भारतीयांची चमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:34 AM2018-08-28T07:34:54+5:302018-08-28T07:35:20+5:30
आशियाई स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. तिने यामागुचीला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून यामागुची दुसºया स्थानी आहे
आशियाई स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. तिने यामागुचीला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून यामागुची दुसºया स्थानी आहे. हा सामना खूपच अटीतटीचा झाला. सिंधूने दुसरा गेम गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. आता अंतिम सामन्यात सिंधू जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चिनी तैपईच्या ताईविरुद्ध भिडेल. ताई हिने उपांत्य सामन्यात सायना नेहवालला नमवून आगेकूच केली. अंतिम फेरीतील खेळाडूंच्या क्रमवारीत नक्कीच अंतर असेल, पण माझ्यामते हे अंतर माफक आहे. सायना आणि सिंधू यांच्या खेळातील फरक सांगायचा झाल्यास, सर्वात महत्त्वाचे वय लक्षात घ्यावे लागेल. सायना सिंधूच्या तुलनेत ५-६ वर्षांनी मोठी आहे. तसेच २०१३ पासून सायनाने ताईला नमवलेले नाही. त्यामुळे एक मानसिक दबावही तिच्यावर आले असेल. तरी सामना सुरु झाला तेव्हा सायना जिंकू शकते असे वाटत होते. कारण या स्पर्धेत सायनाने आपले सर्व सामने सरळ दोन गेममध्ये जिंकलेले आहेत आणि त्यामुळे ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती. पण ताईने जबरदस्त खेळ केला. मला वाटतं की दुसºया गेममध्ये सायना थोडी हळूवार झाल्याचे दिसले.
हॉकीमध्ये भारताच्या दोन्ही संघांकडून पदकांची अपेक्षा आहे. ज्याप्रकारे भारताचा महिला संघ खेळत आहे आणि ज्याप्रकारे त्यांनी द. कोरियाला नमवले, ते पाहता संघ अत्यंत मजबूत असल्याचे दिसून आले. दोन्ही संघांसाठी सुवर्ण पदक नक्कीच अवाक्यात आहे, पण त्यांनी गाफील राहता कामा नये. नाहीतर त्याचा मोठा फटका बसेल. दुसरीकडे झुंजार दुती चंदने सर्वांचे लक्ष वेधले. ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आली आहे. तिच्या जिद्दिला मी सलाम करतो. याशिवाय हिमा दास, मोहम्मद अनस यांनीही रौप्य कमाई केली. या तिघांनी अॅथलेटिक्समध्ये चमकदार कामगिरी केली.
क्रिकेटसाठी सोमवारचा दिवस खास ठरला. दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या ११०व्या जयंतीनिमित्त संपूर्ण क्रिकेटविश्वाने त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या फलंदाजीची सरासरी ९९.९४ इतकी जबरदस्त होती. कोणताही फलंदाज इतकी सरासरी गाठण्याची कल्पनाही करु शकत नाही. १९९१-९२च्या दरम्यान भारताच्या आॅस्टेÑलिया दौºयादरम्यान माझी त्यांच्याशी भेट झाली होती, पण संवाद झाला नव्हता. अॅडलेड स्टेडियमवर तेव्हा ते खास सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहण्यास आले होते. जेव्हा आम्हाला कळाले की ब्रॅडमन आलेत, तेव्हा आम्ही सामना सोडून त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी आमच्या आॅस्टेÑलियातील पत्रकार बंधूंनी भारतीय पत्रकारांची ब्रॅडमन यांच्यासह ओळख करुन दिली होती.
अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार