भारताच्या महिला तिरंदाजांना रौप्यपदक, मिश्र गटात कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 04:33 PM2018-07-21T16:33:35+5:302018-07-21T17:25:29+5:30

भारताच्या महिला संघाला जर्मनीच्या बर्लिन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

India's archer women team won silver medal | भारताच्या महिला तिरंदाजांना रौप्यपदक, मिश्र गटात कांस्य

भारताच्या महिला तिरंदाजांना रौप्यपदक, मिश्र गटात कांस्य

Next

बर्लिन - भारताच्या महिला संघाला जर्मनीच्या बर्लिन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत फ्रान्सने 229-228 अशा फरकाने भारतीय संघाला पराभूत केले. भारताच्या रौप्यपदक विजेत्या संघात त्रिशा देब, ज्योती सुरेखा आणि मुस्कान किरार यांचा समावेश होता. उपांत्य फेरीत या खेळाडूंनी अव्वल मानांकित टर्कीवर 231-228 असा विजय मिळवला होता. 



पाचव्या मानांकित भारतीय संघाने या स्पर्धेत ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांना अनुक्रमे पहिल्या व दुस-या फेरीत पराभूत केले होते. 
 
 

दरम्यान, मिश्र गटात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा यांनी मिश्र गटात भारताला कांस्यपदक जिंकून दिले. त्यांनी टर्कीवर 156-153 असा विजय मिळवला. 



 

Web Title: India's archer women team won silver medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा