कोरिया ओपनमध्ये भारताची खराब सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2015 11:52 PM2015-09-15T23:52:54+5:302015-09-15T23:52:54+5:30
भारताची मिश्र दुहेरी जोडी तरुण कोना - सिक्की रेड्डी यांना कोरिया ओपन बॅडमिंटन सुपर सिरिजच्या पहिल्याच फेरीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार
सोल : भारताची मिश्र दुहेरी जोडी तरुण कोना - सिक्की रेड्डी यांना कोरिया ओपन बॅडमिंटन सुपर सिरिजच्या पहिल्याच फेरीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अव्वल मानांकीत झांग ना - झाओ युन्लेइ यांच्या विरुद्ध पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टा आले.
एकतर्फी झालेल्या या
सामन्यात चीनी जोडीच्या आक्रमक खेळापुढे भारतीय जोडीला ११-२१,
१०-२१ अशा मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. केवळ अर्धा तास रंगलेल्या या सामन्यात चीनी आक्रमणांपुढे तरुण - सिक्की यांचा निभाव लागला नाही.
चांगली सुरुवात केल्यानंतर तरुण - सिक्की यांचा खेळ पुर्णपणे खालावला. पहिल्या सेटमध्ये ५-० अशी आघाडी घेतल्याचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले. दडपणाखाली केलेल्या चुकांचा फटका बसल्याने भारतीयांना सेट गमवावा लागला. यानंतरच्या सेटमध्ये मात्र चीनी खेळाडूंनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना भारतीय जोडीला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. आता सिक्की प्रज्ञा गद्रेच्या सोबतीने महिला दुहेरीमध्ये जपानच्या शिजुका मत्सुओ - मामी नेइतो यांच्याविरुध्द खेळेल. भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप आजपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. (वृत्तसंस्था)