कोहली, रहाणेच्या शतकानंतरही भारताची फलंदाजी कोसळली

By admin | Published: December 28, 2014 01:47 PM2014-12-28T13:47:40+5:302014-12-28T15:03:59+5:30

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

India's batting collapsed even after Kohli, Rahane's century | कोहली, रहाणेच्या शतकानंतरही भारताची फलंदाजी कोसळली

कोहली, रहाणेच्या शतकानंतरही भारताची फलंदाजी कोसळली

Next

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २८ - विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

तिस-या दिवशी एक बाद १०८ धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा २५ आणि मुरली विजय ६८ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद १४७ अशी झाली होती. यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताच्या डावाला आकार देत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तरही दिले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी तब्बल २६२ धावांची भागीदारी केली.  नॅथन लियॉनने रहाणे १४७ धावांवर बाद ही जोडी फोडली. रहाणे बाद झाला त्यावेळी भारताने ५ गडी गमावत ४०९ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर तळाचे फलंदाज  स्वस्तात तंबूत परतले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा लोकेश राहुल फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ तीन धावा करुन तंबूत परतला. त्यापाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंह धोनी ११ धावांवर तर आर. अश्विन भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यामुळे तिस-या दिवशी भक्कम धावसंख्या उभारुन भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देऊन अशी आशा असतानाच  भारताची अवस्था ७ बाद ४३४ अशी झाली. तिस-या दिवसाच्या शेवटच्या षटकात विराट कोहली १६९ धावांवर बाद झाला.मोहम्मद शमी ११ धावांवर नाबाद आहे.  ऑस्ट्रेलियातर्फे रॅन हॅरिसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहेत. 

Web Title: India's batting collapsed even after Kohli, Rahane's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.