तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजीत भारताच्या भवानीदेवीला सुवर्ण
By admin | Published: May 29, 2017 12:32 AM2017-05-29T00:32:29+5:302017-05-29T00:32:29+5:30
भारताच्या सी.ए. भवानीदेवी हिने आइसलँड येथील रेकजाविक येथे झालेल्या तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सुवर्णपदक
चेन्नई : भारताच्या सी.ए. भवानीदेवी हिने आइसलँड येथील रेकजाविक येथे झालेल्या तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सुवर्णपदक जिंकले. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत सी.ए. भवानीदेवी हिने ग्रेट ब्रिटनच्या सारा जेन हॅम्पसन हिचा १५-१३ असा पराभव केला. चेन्नईच्या या महिला खेळाडूने उपांत्य फेरीत ब्रिटनची एक अन्य खेळाडू जेसिका कोरबी हिला १५-११ अशा फरकाने नमवले होते. त्याचबरोबर भवानीदेवी ही आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे. रेकजाविक येथून भवानीदेवी हिने म्हटले, ‘मी या स्पर्धेत तिसऱ्यांदा खेळत होते. गतवर्षी मी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली होते. आता मी पहिले पदक जिंकले आहे. हे जागतिक पातळीवरील स्पर्धेतीलही पहिले पदक आहे. मी आशियाई आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही पदक जिंकले आहे.’
उपांत्यपूर्व फेरीनंतर स्पर्धा जास्त कठीण होती आणि उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत ब्रिटिश खेळाडूंनी कडवी झुंज दिली असल्याचेही तिने सांगितले. (वृत्तसंस्था)