‘सॅग’वर भारताची मोहोर

By admin | Published: February 17, 2016 02:44 AM2016-02-17T02:44:04+5:302016-02-17T02:44:04+5:30

यजमान भारताने दक्षिण आशियाई विभागात खेळातील वर्चस्व कायम राखताना विक्रमी ३०८ पदकांसह मंगळवारी संपलेल्या १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.

India's blooms on 'sag' | ‘सॅग’वर भारताची मोहोर

‘सॅग’वर भारताची मोहोर

Next

गुवाहाटी/शिलाँग : यजमान भारताने दक्षिण आशियाई विभागात खेळातील वर्चस्व कायम राखताना विक्रमी ३०८ पदकांसह मंगळवारी संपलेल्या १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.
महिला बॉक्सर्सनी तिन्ही सुवर्णपदके पटकावली, तर ज्यूदोपटूंनी अखेरच्या दिवशी दोन सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. भारताने एकूण १८८ सुवर्ण, ९९ रौप्य व ३० कांस्यपदके पटकावली. भारताने पदकाचे त्रिशतक ओलांडले. यापूर्वी २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ९० सुवर्णपदकांसह एकूण १७५ पदके पटकावली होती.
श्रीलंका एकूण १८६ पदकांसह (२५ सुवर्ण, ६३ रौप्य, ९८ कांस्य) दुसऱ्या स्थानी राहिला. पाकिस्तानला १०६ पदकांसह (१२ सुवर्ण, ३७ रौप्य, ५७ कांस्य) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अफगाणिस्तानने सात सुवर्णपदकांसह एकूण ३५ पदके पटकावताना चौथे स्थान मिळवले. बांगलादेशने चार सुवर्णपदकांसह एकूण ७५ पदके पटकावत पाचवे, तर नेपाळने तीन सुवर्णपदकांसह एकूण ६० पदकांची कमाई करताना सहावे स्थान पटकावले. मालदीव व भूतान यांना सुवर्णपदक पटकावता आले नाही. मालदीवने दोन रौप्यपदकांसह एकूण तीन पदके पटकावली. मालदीव सातव्या, तर एक रौप्य व १५ कांस्यपदके पटकावणारा भूतान एकूण १६ पदकांसह आठव्या स्थानी आहे.
चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवशी सर्व स्पर्धा शिलाँगमध्ये झाल्या. महिला बॉक्सर्स व ज्यूदोपटूंनी अंतिम लढती जिंकल्या. बॉक्सर्सनी सर्व १० सुवर्णपदके पटकावताना भारतासाठी ‘परफेक्ट १०’ची नोंद केली. यापूर्वी पुरुष बॉक्सर्सनी ७ सुवर्ण पदके जिंकण्याची कामगिरी केली होती, तर महिला बॉक्सर्सनी मंगळवारी क्लीन स्वीप केले.
वैयक्तिक कामगिरीचा विचार करता श्रीलंके चा जलतरणपटू मॅथ्यू एबेसिंघेने चमकदार कामगिरी करीत सात सुवर्णपदके पटकावली. भारतीय नेमबाज चैन सिंगने शानदार कामगिरी केली आणि आॅलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगवर वर्चस्व गाजवले. चैनने या स्पर्धेत एकूण सहा सुवर्णपदकांवर नाव कोरले. (वृत्तसंस्था)

Web Title: India's blooms on 'sag'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.