भारताचा लाओसवर धमाकेदार विजय

By admin | Published: June 8, 2016 04:29 AM2016-06-08T04:29:04+5:302016-06-08T04:29:04+5:30

स्ट्रायकर जे. जे. लालपेखलुआ याने केलेल्या शानदार २ गोलच्या जोरावर भारताने पिछाडीवरून बाजी मारताना लाओसचा ६-१ असा फडशा पाडला.

India's booming victory over Laos | भारताचा लाओसवर धमाकेदार विजय

भारताचा लाओसवर धमाकेदार विजय

Next


गुवाहाटी : स्ट्रायकर जे. जे. लालपेखलुआ याने केलेल्या शानदार २ गोलच्या जोरावर भारताने पिछाडीवरून बाजी मारताना लाओसचा ६-१ असा फडशा पाडला. या धमाकेदार विजयासह भारताने २०१९मध्ये होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत जागा निश्चित केली.
इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दमदार सुरुवात केलेल्या लाओसने १६व्या मिनिटाला खोनेशावाना शिहावोंगने केलेल्या गोलच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर यजमान भारताने एकहाती वर्चस्व राखताना लाओसला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.लालपेखलुआ याने ४२व्या आणि ७४व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. तर, सुमीत पस्सी (४५वे मिनीट), संदेश झिंगन (४९वे मिनीट), मोहंमद रफिक (८३वे मिनीट) आणि पदार्पण करणारा फुलगांको कारडोजो (८७वे मिनीट) यांनी प्रत्येकी एक गोल करताना भारताच्या विजयाला हातभार लावला. विशेष म्हणजे, भारताने घरच्या मैदानावर व विदेशात झालेल्या दोन सत्रांच्या या लढतीत एकूण गुणसंख्येच्या जोरावर ७-१ अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)

Web Title: India's booming victory over Laos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.