भारताला तिरंदाजीत कांस्यपदक, रजत चौहान, अभिषेक वर्मा, अमन सैनी यांचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:40 AM2019-05-26T03:40:36+5:302019-05-26T03:40:46+5:30
रजत चौहान, अभिषेक वर्मा व अमन सैनी या पुरुष कम्पाऊंड संघाने शनिवारी तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारताला एकमेव कांस्यपदक मिळवून दिले.
अंताल्या (तुर्की) : रजत चौहान, अभिषेक वर्मा व अमन सैनी या पुरुष कम्पाऊंड संघाने शनिवारी तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारताला एकमेव कांस्यपदक मिळवून दिले. भारताच्या या तीन खेळाडूंनी रशियाच्या एंटन बुलाएव, अलेक्झॅँडर दाम्बाएव व पावेल क्रिलोव्ह यांचा समावेश असणाºया संघाला कास्यपदक प्ले आॅफमध्ये २३५-२३० गुणांनी पराभूत केले.
भारताचा महिला संघही कास्यपदकाच्या शर्यतीत होता. मात्र ज्योती सुरेखा वेनाम, मुस्कान किरार व स्वाती दुधवाल यांना इंग्लंडच्या लैला एनिसन, इला गिब्सन व लुसी मेसन यांच्या संघाने २२६- २२८ गुणांनी पराभूत केले.
भारतीय तिरंदाज रिकर्व्ह प्रकारात आपली छाप पाडू शकले नाहीत.भारताला या प्रकारात एकही पदक मिळाले नाही.
नेदरलंडमध्ये होणाºया जागतिक चॅम्पियन स्पर्धा आॅलिम्पिक पात्रता फेरी असेल. या स्पर्धेपूर्वीची ही विश्वचषक स्पर्धेतील तिसरी व अंतिम फेरी होती.