भारताची सावध सुरुवात

By admin | Published: February 15, 2017 12:37 AM2017-02-15T00:37:53+5:302017-02-15T00:37:53+5:30

कर्णधार मॅक्स होल्डन व जॉर्ज बर्टलेट यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर इंग्लंड अंडर-१९ संघाने

India's cautious start | भारताची सावध सुरुवात

भारताची सावध सुरुवात

Next

नागपूर : कर्णधार मॅक्स होल्डन व जॉर्ज बर्टलेट यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर इंग्लंड अंडर-१९ संघाने पहिल्या युुवा कसोटी सामन्यात मंगळवारी पहिल्या डावात विशाल धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात खेळताना भारतीय युवा संघाने सावध सुरुवात केली.
होल्डनने १७० तर बर्टलेटने १७९ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२१ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने पहिला डाव ५ बाद ५०१ धावसंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १५६ धावांची मजल मारली. यजमान संघ ३४५ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने रोहित कन्नूमल (१३) याला लवकर गमावले. त्यानंतर अभिषेक गोस्वामी (६६) व सौरभ सिंग (नाबाद ५३) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. आजचा खेळ थांबला त्यावेळी सौरभ सिंग याला कर्णधार जॉन्टी सिद्ध (२३) साथ देत होता.
त्याआधी, इंग्लंडने सकाळच्या सत्रात १ बाद ३११ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. होल्डन व बर्टलेट यांनी युवा कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी नोंदविण्याचा विक्रम केला. या दोघांनी अजिंक्य रहाणे व तन्मय श्रीवास्तव यांचा २९१ धावांचा विक्रम मोडला. (क्रीडा प्रतिनिधी)

धावफलक
इंग्लंड (पहिला डाव-१ बाद ३११ वरून पुढे) : मॅक्स होल्डन त्रि.गो. फेरारिओ १७०, जॉर्ज बार्टलेट यष्टिचित लोकेश्वर गो. जोसेफ १७९, डेलरे रॉलिन्स नाबाद ७०, ओली पोप झे. जोसेफ गो. सेठ १८, विल जॅक्स झे. फेरारिओ गो. सिद्धू ९, युआॅन वुड्स नाबाद १, अवांतर-३३, एकूण-१३१.१ षटकांत ५ बाद ५०१ (डाव घोषित).बाद क्रम : १-५७, २-३७८, ३-४१८, ४-४७९, ५-४९०. गोलंदाजी : कनिश सेठ २६-६-८५-२, रिषभ भगत २४-२-७५-०, विनीत पन्वर १४-०-७१-०, सिजोमन जोसेफ २२-३-८४-१, डॅरिल फेरारिओ २५-७-८७-१, सौरभ सिंग ९-१-४१-०, जॉंटी सिद्धू ११.१-०-४२-१.
भारत (पहिला डाव) : अभिषेक गोस्वामी झे. बार्टलेट गो. व्हाईट ६६, रोहन कुन्नूमल झे. वुड्स गो. बिअर्ड १३, सौरभ सिंग खेळत आहे ५३, जॉंटी सिद्धू खेळत आहे २३. अवांतर-१, एकूण ४३ षटकांत २ बाद १५६.बाद क्रम : १-२३, २-१२०. गोलंदाजी : आरोन बिअर्ड ८-१-४४-१, हेन्री ब्रुक्स १०-४-३८-०, आर्थर गोडसल ६-२-१४-०, लियाम व्हाईट १२-२-३८-१, डेलरे रॉलिन्स ४-१-१४-०, मॅक्स होल्डन ३-०-७-०.

Web Title: India's cautious start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.