विकास क्रिशनच्या पराभवाने बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपले

By admin | Published: August 16, 2016 07:31 AM2016-08-16T07:31:09+5:302016-08-16T07:31:09+5:30

७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात भारताच्या विकास क्रिशनचा उझबेकिस्तानच्या बेकतीमीर मेलिकुझीव्हने पराभव केला.

India's challenge in Boxing ended with the defeat of Vikas Krishan | विकास क्रिशनच्या पराभवाने बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपले

विकास क्रिशनच्या पराभवाने बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपले

Next

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. १६ - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. ७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात भारताच्या विकास क्रिशनचा उझबेकिस्तानच्या बेकतीमीर मेलिकुझीव्हने पराभव केला. मेलिकुझीव्हने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. 
 
विकासच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. ५६ किलो वजनी गटात शिव थापा, ६४ किलोमध्ये मनोज कुमार यांचा आधीच पराभव झाला होता. हा सामना जिंकून विकासने उपांत्यफेरीत प्रवेश केला असता तर, भारताचे एक पदक निश्चित झाले असते. 
 
पुरुषांमध्ये आतापर्यंत फक्त विजेंदर सिंहने २००८ बिजींग ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. महिलांमध्ये २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये एमसी मेरीकोमने कांस्यपदक मिळवले होते. 

Web Title: India's challenge in Boxing ended with the defeat of Vikas Krishan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.