चिकनगुनियामुळे भारताचा हा खेळाडू पहिल्या कसोटीतून 'आऊट'
By admin | Published: September 20, 2016 06:38 PM2016-09-20T18:38:42+5:302016-09-20T18:38:42+5:30
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकनगुनियाने आजारी असून न्यूझीलंडविरुद्ध २२ सप्टेंबरपासून ग्रीन पार्कवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २० : भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकनगुनियाने आजारी असून न्यूझीलंडविरुद्ध २२ सप्टेंबरपासून ग्रीन पार्कवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
भारतीय संघाच्या सराव सत्रानंतर पत्रकारांसोबत बोलताना कुंबळे म्हणाले, संघव्यवस्थापनाने त्याच्या स्थानी अन्य दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्याची सूचना दिलेली नाही.ह्ण ईशांतच्या अनुपस्थितीत भारताच्या ५०० व्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद शमी, उमेश यादव व भुवनेश्वर कुमार सांभाळतील.
कुंबळे म्हणाले, ईशांत चिकनगुनियाने आजारी असून तो लवकरच फिट होईल, अशी आशा आहे. त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे, पण पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळणार नसल्याचे निश्चित आहे. आम्ही ईशांतच्या स्थानी पर्यायी खेळाडूचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम ११ खेळाडूंची निवड उर्वरित १४ खेळाडूंमधून करण्यात येईल. संघातील उर्वरित खेळाडू फिट आहेत.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या गोलंदाजीचे आक्रमण सांभाळणाऱ्या ईशांतने भारतातर्फे ७२ कसोटी सामने खेळताना ३६.७१ च्या सरासरीने २०९ बळी घेतले आहे. त्याने नुकत्याच संपलेल्या विंडीज दौऱ्यात चार कसोटी सामन्यांत आठ बळी घेतले होते.
फिटनेसच्या कारणास्तव कसोटी सामन्यातून बाहेर झालेला ईशांत भारताचा पहिला खेळाडू आहे. न्यूझीलंडच्या संघाला मात्र खेळाडूंच्या फिटनेची चिंता सतावत आहे. अष्टपैलू जेम्स नीशाम बरगडीच्या दुखापतीमुळे कानपूर कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही तर वेगवान गोलंदाज टीम साऊदी दुखापतीमुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून यापूर्वीच 'आऊट' झाला आहे.