जागतिक बॉक्सिंग सीरिजमध्ये भारताचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:30 AM2017-12-20T00:30:10+5:302017-12-20T00:30:21+5:30

जागतिक बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) अर्ध - व्यावसायिक जागतिक बॉक्सिंग सीरिज (डब्ल्यूएसबी) स्पर्धेत भारताच्या बॉक्सिंग संघाचे पुनरागमन होत आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाºया या स्पर्धेच्या आठव्या सत्रातील आशियाई गटात भारतीय संघाचा समावेश करण्यात आला आहे.

 India's comeback in the World Boxing Series | जागतिक बॉक्सिंग सीरिजमध्ये भारताचे पुनरागमन

जागतिक बॉक्सिंग सीरिजमध्ये भारताचे पुनरागमन

Next

लुसाने : जागतिक बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) अर्ध - व्यावसायिक जागतिक बॉक्सिंग सीरिज (डब्ल्यूएसबी) स्पर्धेत भारताच्या बॉक्सिंग संघाचे पुनरागमन होत आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाºया या स्पर्धेच्या आठव्या सत्रातील आशियाई गटात भारतीय संघाचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेतील भारतीय फ्रेंचाइजीचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, या फ्रेंचाइजीची मालकी भारतीय बॉक्सिंग संघटनेकडे (बीएफआय) असेल. भारताचा हा अधिकृत संघ मुंबई फायटर्सची जागा घेईल. ‘बीएफआय’कडून अधिकृत मान्यत न मिळाल्यानंतर मुंबई फायटर्सने स्पर्धेतून माघार घेतली.
याबाबत ‘एआयबीए’ने एका निवेदनाद्वारे म्हटले की, ‘डब्ल्यूएअबीमधील तिन्ही गटातील लढतींसह नियमित विभागीय लढती आणि विश्व प्ले - आॅफ लढती देखील खेळविण्यात येतील.
यामध्ये युरोपमधून क्रिएशियन नाइट हा संघ सहभागी होत असून आशियाई गटात पहिल्यांदाच भारताकडून एक संघ सहभागी होत आहे.’ त्याचप्रमाणे, ‘आठव्या सत्रातून आम्ही आणखी पुढे जात आहोत. चांगले प्रदर्शन करण्याची भारतीय बॉक्सर्सची भूक आणखी वाढत आहे. यामुळे या स्पर्धेला नवे वलय आणि स्तर मिळेल. तसेच, क्रोएशिया नाइट संघाच्या सहभागामुळे या स्पर्धेत बॉक्सिंगमधील सर्व मोठे देश जोडले जातील,’ असेही ‘एआयबीए’ने म्हटले. (वृत्तसंस्था)

Web Title:  India's comeback in the World Boxing Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.