पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2016 09:07 PM2016-02-09T21:07:27+5:302016-02-09T22:41:48+5:30

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा

India's defeat in the first T20 match | पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा पराभव

पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा पराभव

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ९ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा कापूगेदेरा यांनी संघाला सावरत चागंली फलंदाजी केल्यामुळे संघाच्या धाव संख्येत भर पडली. कर्णधार दिनेश चंदिमलने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या, तर चामरा कापूगेदेराने २६ चेंडूत चार चौकार लगावत २५ धावा केल्या.  भारताने दिलेले १०१ धावांने आव्हान श्रीलंकेने पाच गडी राखून १८ षटकात पूर्ण केले. 

सुरुवातीला भारताने १८.५ षटकात सर्वबाद १०१ धावा केल्या. भारताकडून आर. आश्विन ३१ धावांवर नाबाद राहिला. त्याने एकतर्फी लढा देत बारताचा शंभरी ओलांढून दिली. भारतातर्फे मुंबईकर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तसेच शिखर धवन ३५ धावांतच तंबुत परतले. श्रीलंकन गोलंदाज कासुन रजिताने रोहितला दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतवले. तर शिखर धवन (9 धावा) आणि अजिंक्‍य रहाणे (4 धावा) यांनाही कसूननेच टिपले. महेंद्रसिंह धोनी (२), हार्दिक पंड्या (२), रवींद्र जडेजा (६), सुरेश रैना (२०), युवराज सिंग(१०), आशिष नेहरा(६) जसप्रित बुमराह (०) धावांचे योगदान दिले. 

श्रीलंकेच्या कासुन रजिता आणि दासुन शनाका यांनी भारताच्या ३ फलंदाजानां बाद करत भारताची आघाडीची फळी उद्वस्त केली. तर दुशमंथा चामिराने २ आणि सचित्रा सेनानायकेने १ गडी बाद केला. 
दरम्यान, टी-२० च्या विश्वविजेत्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज सुरुवात झाली. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवरील मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकन गोलंदाजांनीही आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांना लवकरच तंबुत परतवले. 
मागील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, रंगना हेराथ, नुवान कुलशेखरा, तिलकरत्ने दिलशान यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेला मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ कमकुवत मानला जात होता. 
 

 

Web Title: India's defeat in the first T20 match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.