अखेरच्या चेंडूवर भारताचा पराभव, केदार जाधवची एकाकी झुंज

By Admin | Published: January 22, 2017 09:42 PM2017-01-22T21:42:46+5:302017-01-22T22:32:38+5:30

मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला ईडन गार्डन्सवर रंगलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने 5 धावांनी पराभव केला आहे

India's defeat in the last ball, Kedar Jadhav's lonely batting | अखेरच्या चेंडूवर भारताचा पराभव, केदार जाधवची एकाकी झुंज

अखेरच्या चेंडूवर भारताचा पराभव, केदार जाधवची एकाकी झुंज

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 22 - मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाचा ईडन गार्डनवर रंगलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने 5 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केदारने 90 धांवांची झुंजार खेळी केली, मात्र शेवटच्या षटकात 3 चेंडूवर सहा धावांची आवशकता असताना मोठा फटका मारण्याच्या नादात केदार बाद झाला आणि भारतावर पराभवचे संकट ओढावले. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1ने पराभव केला. 
 
नाणेफेक जिंकून विराटने इंग्लड संघाला प्रथम फंलदाजीसाठी आंमत्रीत केलं होत. पहिल्या दोन सामन्यांनंतर कोलकाता वनडेत देखील तीनशेहून अधिक धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लड संघाने जेसन रॉय(65), बेअरस्टो (56 ), स्टोक्स नाबाद 57 आणि कर्णधार मॉर्गन (43) यांच्या फलंदाजीच्या बळावर 50 षटकात आठ बाद 321 धावा करत भारताला विजयासाठी 322 धावांचे आव्हान दिले होते.
 
इंग्लंडने दिलेले 322 धावांचे आव्हान पार करताना केदार जाधव(90) कर्णधार विराट कोहली (55), हार्दिक पांड्या (55) आणि युवराज सिंग(45) यांचे प्रयत्न विजयासाठी अपुरे पडले. 
 
त्यापुर्वी, प्रथम  करताना इंग्लंडच्या समामीवीरांनी सावध सुरुवात करताना पहिल्या 10 षटकात नाबाद 43 धावांची भागीदारी केली होती. 10 षटकानंतर जेसन रॉय आणि सॅंम बिलिंग्ज तडफदार फटक्यांनी धावा वसूल करण्यास सुरूवात केली. सलामीजोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजाने जेनिंग्जला बाद केले. त्यानंतर दुसरी विकेट देखील जडेजानेच घेतली. घातक जेसन रॉय(65) याचा जडेजाने त्रिफळा उडवून तंबूत धाडले. त्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि बेअरस्टो यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरला. पण पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मॉर्गन 43 धावांवर झेलबाद झाला. बेअरस्टोने अर्धशतक ठोकले खरे पण तो देखील 56 धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. जोस बटलरला (11) देखील पंड्याने माघारी धाडले. तर बुमराहने मोईन अली याला बाऊन्सवर झेलबाद करून बाद केले. अखेरच्या षटकात वोक्स 19 चेंडूत 34 धावा काडून धावबाद झाला. तर स्टोक्सने नाबाद 57 धावांची खेळी केली. 
 
भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्या अचूक माऱ्यासमोर वेगाने धावा जमवता न आल्याने पहिल्या दहा षटकात इंग्लंडला बिनबाद 43 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 3, जडेजाने 2 तर बुमराहने एका फलंदाजाला बाद केले. 

Web Title: India's defeat in the last ball, Kedar Jadhav's lonely batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.