भारत पुन्हा पराभवाच्या ‘रूट’वर

By admin | Published: August 17, 2014 01:38 AM2014-08-17T01:38:47+5:302014-08-17T01:38:47+5:30

इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुक, गॅरी बॅलन्स, जोस बटलर यांच्यानंतर जो रूटने केलेल्या फटकेबाजीने भारताला पुन्हा पराभवाच्या ‘रूट’वर आणले आहे.

India's defeat to 'Root' | भारत पुन्हा पराभवाच्या ‘रूट’वर

भारत पुन्हा पराभवाच्या ‘रूट’वर

Next
>इंग्लंडकडे 237 धावांची आघाडी : कुक, बॅलन्स, बटलरपाठोपाठ जो रूटची फटकेबाजी
लंडन  : इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुक, गॅरी बॅलन्स, जोस बटलर यांच्यानंतर जो रूटने केलेल्या फटकेबाजीने भारताला पुन्हा पराभवाच्या ‘रूट’वर आणले आहे. पाचव्या कसोटीच्या दुस:या दिवसअखेर इंग्लंडने 7 बाद 385 धावांची मजल मारून 237 धावांची आघाडी घेतली आहे. रूट 92, तर क्रिस जॉर्डन 19 धावांवर खेळत आहेत. उशिरा का होईना, ईशांत शर्मा, आर अश्विन, वरुण, अॅरोन यांना गवसलेला सूर, ही भारतासाठी दिलासादायक बाब म्हणायला हरकत नाही.
दुस:या दिवसाचा खेळ सुरू झाला त्या वेळी इंग्लंड मोठय़ा आघाडीकडे सहज वाटचाल करील असेच वाटत होते. मात्र, दिवसाचे पहिले षटक टाकताना वरुण अॅरोन याने  पाचव्या चेंडूंवर सॅम रॉबसन याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर भारत कमबॅक करेल असे वाटत असताना कुक आणि बॅलन्स या जोडीने इंग्लंडच्या आशा पल्लवीत केल्या. या दोघांनी संयमी आणि तितक्याच जलदपणो धावांची गती वाढवत भारताच्या पहिल्या डावातील 148 धावांचा पल्ला पार केला.  या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यांना भारतीय क्षेत्ररक्षकांनीही मदत केली. कुक 67 व 71 धावांवर असताना अनुक्रमे मुरली विजय आणि अजिंक्य रहाणो यांनी स्लीपमध्ये त्याचे झेल सोडले. 
मात्र, या संधीचा फायदा फार काळ कुकला उठविता आला नाही.  58व्या षटकात अॅरोन याने कुकला मुरली विजयकरवी झेलबाद करून 125 धावांची कुक व बॅलन्स यांची भागीदारी तोडली. अवघ्या दहा धावांच्या अंतराने अश्विनने बॅलन्सला बाद करून इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. या दोघांच्या लेट कमबॅकने भारतीय चमूत आनंदाचे व आशेचे वातावरण निर्माण केले. त्यात भर टाकली ती ईशांत शर्माने. त्याने बेलला अप्रतिम इनस्विंग डिलिव्हरीवर खेळण्यास भाग पाडले आणि धोनीच्या हातात तो झेल देऊन माघारी परतला. बेलपाठोपाठ थोडय़ा धावांच्या फरकाने  मोईल अली याला अश्विनने त्रिफळाचीत करून इंग्लंडचा निम्मा संघ अवघ्या 229 धावांत गुंडाळला. त्यानंतर मात्र जो रूटने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने सुरुवातीला जोस बटलरसह सहाव्या विकेटसाठी 8क् धावांची भागीदारी केली. शर्मा आणि भुवनेश्वर कुमारने अनुक्रमे बटलर व क्रिस वोक्सला माघारी धाडले. रूट मात्र एका बाजूने लढत होता त्याने आठव्या विकेटसाठी क्रिस जॉर्डनसह नाबाद 67 धावा जोडल्या. रूटने 129 चेंडूंत 9 चौकार व एक षटकार ठोकून नाबाद 92 धावा केल्या आहेत. 
 
च्कर्णधार अॅलेस्टर कुक आणि गॅरी बॅलन्स यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दोघांनी अगदी संयमी खेळ करत 36.5 षटके खेळून काढली. त्यांनी 3.39च्या सरासरीने 125 धावांची दमदार भागीदारी करून डाव सावरला. 
 
च्भारत (पहिला डाव) : विजय झे. रुट गो. वोक्स 18, गंभीर झे. बटलर गो. अॅण्डरसन क्, पुजारा त्रि. गो. ब्रॉड 4, कोहली पायचीत गो. जॉर्डन 6, रहाणो झे. व गो. जॉर्डन क्, धोनी झे. वोक्स गो. ब्रॉड 82 , बिनी झे. कुक गो. अॅण्डरसन 5, अश्विन झे. रुट गो. वोक्स 13, कुमार झे. बटलर गो. जॉर्डन 5, अॅरोन झे. व गो. वोक्स 1, शर्मा नाबाद 7. अवांतर - 7, एकूण - सर्वबाद 148 धावा; गोलंदाज - जॉर्डन 3-32, वोक्स 3-3क्, जेम्स 2-51, ब्रॉड 2-27. 
च्इंग्लंड  (पहिला डाव) : कुक झे. विजय गो. अॅरोन 79, रॉबसन त्रि. गो. अॅरोन 37, बॅलन्स झे. पुजारा गो. अश्विन 64, बेल झे. धोनी गो. शर्मा 7, रुट नाबाद 92, अली त्रि. गो. अश्विन 14, बटलर झे. अश्विन गो. शर्मा 45, वोक्स झे. धोनी गो. कुमार क्, जॉर्डन नाबाद 19. अवांतर - 28; एकूण - 7 बाद 385 धावा. गोलंदाज - कुमार 1-86, शर्मा 2-58, अॅरोन 2-111, अश्विन 2-55.
 
2001 सालानंतर भारताने सहावेळा 38व्या षटकानंतर फिरकीपटूला गोलंदाजीसाठी पाचारण केले, तर यंदाच्या वर्षातील ही तिसरी घटना.
11 वेळा इंग्लंडने प्रतिस्पर्धी संघाचा पहिला डाव 15क्हून कमी धावांत गुंडाळून पराभव पत्करला असून, यातील सर्वाधिक 7 पराभव त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पत्करले आहेत. 
 
83 षटकांत 8 निर्धाव षटके आणि 226 धावा दिल्यानंतर आर. अश्विनने शनिवारी 2क्13 नंतरची पहिली विकेट घेतली. त्याने गॅरी बॅलेंन्सला केले. अश्विनने 26 जानेवारी 2क्13 रोजी अॅडलेड कसोटीत एड कोवानला बाद केले होते. 

Web Title: India's defeat to 'Root'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.