रहाणेसारखा ‘संयमी’ कर्णधार हे टीम इंडियाचे नशीब : चॅपेल

By Admin | Published: March 30, 2017 01:26 AM2017-03-30T01:26:33+5:302017-03-30T01:26:33+5:30

‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या

India's destiny in captaincy like 'Rahim' captain: Chappell | रहाणेसारखा ‘संयमी’ कर्णधार हे टीम इंडियाचे नशीब : चॅपेल

रहाणेसारखा ‘संयमी’ कर्णधार हे टीम इंडियाचे नशीब : चॅपेल

googlenewsNext

नवी दिल्ली : ‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या स्टाईलने संघाचे नेतृत्व करतो, तर कोहलीच्या नेतृत्वाची स्टाईल त्यापेक्षा वेगळी आहे. अशा दोन्ही वृत्तीचे कर्णधार एकाच वेळी संघात असल्याने टीम इंडिया भाग्यवान आहे, असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी ‘क्रि कइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
धरमशाला कसोटीत जखमी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. भारताने ही कसोटी आठ गड्यांनी जिंकून मालिका २-१ ने खिशात घातली. कसोटीत रहाणेने संयमाने नेतृत्व केले, शिवाय दुसऱ्या डावात आक्र मक फलंदाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
चॅपेल म्हणाले, ‘‘रहाणेने धरमशाला कसोटीत कर्णधार म्हणून खरोखर उत्कृष्ट कामगिरी केली. खऱ्या कर्णधाराची नेतृत्वाची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी असल्याची जेव्हा कल्पना तुम्हाला असते, अशा वेळी त्याची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हानदेखील असते.
आपण काय करावे? मुख्य कर्णधाराचीच पद्धत कायम ठेवून नेतृत्व करावे, की स्वत:च्या स्टाईलने नेतृत्व करावे, हा प्रश्न असतो. रहाणेने अतिशय सोप्या पद्धतीने सामना पार पाडला. शिवाय जिंकून दाखविला. यातून त्याच्या नेतृत्वगुणांचा परिचय घडला.’’
रहाणेने दुसऱ्या डावात भारताचे दोन गडी स्वस्तात बाद झाल्यानंतरही आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता, पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूंत नाबाद ३८ धावा ठोकल्या.
रहाणे कर्णधार म्हणून संयमी आहे. तो आपल्या फलंदाजीतून आक्र मकपणा दाखवून देतो. तुम्ही काय करीत आहात, यावर संघातील खेळाडूंचा तुमच्यावर पूर्ण विश्वास हवा आणि तुम्हाला फक्त चांगली खेळी साकारण्याची गरज असते. संघाचे मनोधैर्य यातून आपोआप उंचावते. कोहली आणि रहाणे यांचे कौशल्य भिन्न आहे. पण धरमशालात रहाणेने ज्या पद्धतीने नेतृत्व केले ते वाखाणण्याजोगे आहे, असेही चॅपेल म्हणाले.
(वृत्तसंस्था)

Web Title: India's destiny in captaincy like 'Rahim' captain: Chappell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.