सातत्य राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार
By admin | Published: July 27, 2014 01:29 AM2014-07-27T01:29:53+5:302014-07-27T01:29:53+5:30
विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ रविवारपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा:या तिस:या कसोटी सामन्यात विजय मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
Next
साऊदम्पटन : लॉर्ड्सच्या हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ रविवारपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा:या तिस:या कसोटी सामन्यात विजय मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुणा भारतीय संघ 1-क् ने आघाडीवर आहे. भारतीय संघात सध्या वसंत ऋतू बहरलाय. पदोपदी याची जाणीव होत आहे. काल संघ जेव्हा सरावासाठी मैदानात आला, तेव्हा खेळाडूंच्या उत्साही देहबोलीवरून ते लक्षात येत होते. भारताने लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या दुस:या कसोटी सामन्यात 95 धावांनी विजय मिळविला होता, तर नॉटिंगहॅममध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत संपला होता.
पाहुण्या संघाने ट्रेन्टब्रिजमध्ये केवळ एकदा फलंदाजी केली, तर लॉर्ड्समध्ये बिन्नीने दुस:या डावात एकही षटक टाकले नाही. धवन व मुरली विजय यांनाही गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. पाच गोलंदाजांना संधी दिली नाही तर भारताने बचावात्मक पवित्र स्वीकारल्याचा संकेत जाईल. पाच गोलंदाजांच्या समावेशामुळे मुख्य गोलंदाजांवरील मानसिक दडपण काहीअंशी कमी होण्यास मदत मिळते. त्यांना विश्रंती मिळण्यासाठी जडेजा व बिन्नी यांच्याकडून 2क् षटकांची गोलंदाजी आवश्यक ठरते.
विशेष अनुभव नसलेल्या भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. लॉर्ड्सच्या हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर अॅन्डरसन व ब्रॉड अपयशी ठरत असताना भारतीय गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पाचव्या गोलंदाजाच्या समावेशासाठी अश्विनचा पर्याय उपलब्ध आहे. अश्विनला या मालिकेत अद्याप संधी मिळालेली नाही. लॉर्ड्सवर विजय मिळविल्यानंतर दोन फिरकीपटूंना संधी देण्याचा विचार नसल्याचे धोनीने स्पष्ट केले होते.
त्यामुळे अश्विनला संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. दुस:या बाजूचा विचार करता यजमान इंग्लंड संघाला कर्णधार अॅलिस्टर कुक व इयान बेल यांच्यासारख्या सिनिअर खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या फिटनेसवर रात्री निर्णय घेण्यात येणार आहे.
जडेजाबद्दलच्या वादाने दु:खी : महेंद्रसिंह धोनी
नॉटिंगहम कसोटी सामन्यात झालेल्या अॅँडरसन-जडेजा वादात जडेजाला दोषी ठरवल्यामुळे भारतीय कर्णधार कमालीचा नाराज झाला आहे. आयसीसीने जडेजावर केलेल्या कारवाईमुळे आपणास दु:ख झाल्याचे त्याने म्हटले आहे. तो म्हणाला,‘ त्या घटनेवेळी मी जडेजापासून काही अंतरावरच होतो.त्याला काहीतरी बोललं म्हणून त्याने मागे वळून पाहीले. यावेळी त्याला धक्का मारला. यावेळी त्याने खूपच सयंम ठेवला. काय झाले हे पाहण्यासाठी त्याने वळून पाहिले. यामुळेच त्याला जबाबदार ठरवून त्याला दंड ठोठावला.’
धोनी म्हणाला,‘ त्या दिवशी जे काही घडले त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या पाठीमागून येऊन काही म्हणत असेल आणि तुम्ही वळून पाहिले तर तो आक्रमकपणा कसा ठरु शकतो. घटना घडली तेंव्हा जडेजाची बॅट त्याच्या काखेत होती आणि मैदानापासून ड्रेसिंगरुममध्ये जाऊर्पयत त्याने एकही शब्द उच्चरला नव्हता. या घटनेवेळी जडेजा कधीही आक्रमक झाला नव्हता म्हणूनची जडेजावरील कारवाईमुळे मला वाईट वाटते.’