भारताचा डबल धमाका

By admin | Published: April 11, 2016 02:32 AM2016-04-11T02:32:18+5:302016-04-11T02:32:18+5:30

बलाढ्य भारताने संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व राखताना नुकत्याच झालेल्या आशियाई खो-खो स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.

India's double explosion | भारताचा डबल धमाका

भारताचा डबल धमाका

Next

मुंबई : बलाढ्य भारताने संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व राखताना नुकत्याच झालेल्या आशियाई खो-खो स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, दोन्ही गटांचे विजेतेपद उंचावताना भारताने बांगलादेशला लोळवले. या आधी झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेतही अंतिम सामना भारत- बांगलादेश असाच रंगला होता.
इंदौर येथे झालेल्या या स्पर्धेच्या महिलांचा अंतिम सामना एकतर्फी झाला. तगड्या भारताने अपेक्षित बाजी मारताना, बांगलादेशचा १४-९, १२-७ असा धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम संरक्षण स्वीकारले. मात्र, कसलेल्या भारताने वेगवान आक्रमण आणि जबरदस्त सांघिक खेळाच्या जोरावर बांगलादेशला संधी न देता जेतेपद निश्चित केले. सारिका काळेने उत्कृष्ट अष्टपैलू खेळ केला तर ऐश्वर्या सावंतने चांगले संरक्षण करून तिला उपयुक्त साथ दिली.
पुरुषांच्या गटात आक्रमण व भक्कम बचाव या जोरावर भारताने बांगलादेशचा २७-१६ असा ११ गुणांनी फडशा पाडला. मध्यंतरालाच १५-७ अशी आघाडी घेऊन भारतीयांनी आपले विजेतेपद निश्चित केले होते. नरेश सावंत, योगेश मोरे व उमेश सातपुते यांनी दमदार कामगिरी केली.

Web Title: India's double explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.