कॅरेबियन भूमीत कामगिरी सुधारण्याचा भारताचा प्रयत्न
By admin | Published: July 8, 2016 07:22 PM2016-07-08T19:22:23+5:302016-07-08T19:22:23+5:30
वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या १५ कसोटीत आठ विजय नोंदविणाऱ्या आणि सात सामने ड्रॉ खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघापुढे २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयासह कामगिरीत सुधारणा
बासेटेरे : वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या १५ कसोटीत आठ विजय नोंदविणाऱ्या आणि सात सामने ड्रॉ खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघापुढे २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयासह कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान असेल.
भारत- विंडीज यांच्यात आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले गेले. त्यात १६ जिंकले तर ३० सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. ४४ सामने अनिर्णित राहिले. गेल्या काही वर्षांपासून विंडीज संघ बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे.
तेव्हापासून भारताने विंडीजवर वर्चस्वदेखील राखले. भारताने मागच्या पाच मालिका जिंकल्या असून त्यातील दोन मालिका विंडीजमध्ये खेळविण्यात आल्या होत्या. विंडीजकडे स्टार खेळाडूंचा अभाव असल्याने विराटच्या नेतृत्वाखालील भारताला रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्याची नामी संधी असेल. कॅरेबियन भूमीत भारत ४५ सामने खेळला आणि पाच सामने जिंकले. १६ सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पहावे लागले.
यंदा कुंबळे यांचा अनुभव आणि विराटच्या युवा संघातील खुमखुमीच्या बळावर भारतीय संघ विंडीजला विंडीजमध्ये धूळ चारण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. चारपैकी किमान तीन सामने भारतीय संघाने जिंकावेत अशी चाहत्यांना अपेक्षा
आहे.