भारताची प्रथम फलंदाजी, संघात २ मोठे बदल
By admin | Published: March 31, 2016 06:46 PM2016-03-31T18:46:28+5:302016-03-31T18:46:28+5:30
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसरा सामना सुरु झाला आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधारने सॅमीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रीत केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसरा सामना सुरु झाला आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधारने सॅमीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रीत केले आहे. भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत, सतत अपयशी ठरणाऱ्या शिखर धवन ऐवजी मुंबईकर अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळाले आहे. तर दुखापतग्रस्त युवराज ऐवजी मनिष पांडेला संघात स्थान दिले आहे. यामधून जिंकणारा संघ ३ तारखेला इंग्लडशी दोन हात करणार आहे. सर्वांचे लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल.
प्रतिस्पर्धी संघ -
वेस्ट इंडिज संघ - डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युएल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल.
भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, मनिष पांडे, रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या.