भारताची प्रथम फलंदाजी - रहाणे, पंड्या आऊट, पंत इन
By admin | Published: July 9, 2017 08:53 PM2017-07-09T20:53:42+5:302017-07-09T20:59:04+5:30
एकमेव टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
किंगस्टन, दि. 9 - एकमेव टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. तर वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय मालिकेत मालिकावीर ठरलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे हार्दिक पंड्यालाही आराम देण्यात आला आहे.
या वर्षीच्या सुरूवातीला इंग्लंडविरोधात बंगळुरू येथे झालेल्या टी-20 सामन्यात पंतला संधी मिळाली होती. धोनीनंतर भविष्यातील यष्टीरक्षक म्हणून पंतकडे पाहिलं जात आहे.
पाच सामन्यांची वन-डे मालिका ३-१ अशी जिंकणाऱ्या भारताला टी-२० जिंकून मालिकेचा शानदार समारोप करायचा आहे. यासाठी ख्रिस गेलच्या फलंदाजीवर अंकुश लावावा लागेल. खराब फॉर्म आणि जखमांशी झुंज देणारा गेल १५ महिन्यांनंतर राष्ट्रीय संघात परतला. आयपीएलमध्येहीतो अपयशी ठरला होता.
उभय संघ असे...
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आणि मोहम्मद शमी.
वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युअल बद्री, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, सुनील नारायण, किरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, मार्लोन सॅम्युअल्स, जेरोम टेलर, चाडविक वॉल्टन, केसरिक विल्यम्स.