नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

By admin | Published: February 14, 2016 07:34 PM2016-02-14T19:34:31+5:302016-02-14T19:34:31+5:30

तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात कर्णधार धोणीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवित आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ आज

India's first bowling by winning toss | नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

Next

ऑनलाइन लोकमत

विशाखापट्टणम, दि. १४ :  तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात कर्णधार धोणीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवित आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ आज तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर पुन्हा एकदा विजय मिळविण्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरलेला आहे. भारतीय संघात कोणताही बदल केला नाही तर श्रीलंकेच्या संघात एकमेव बदल केला आहे. अनुभवी दिलहरा फर्नांडोला संघात स्थान दिले आहे. भारताने जर हा सामना गमानला तर भारतास आपले ICC चे टी २० मधील प्रथम स्थानापासून हात धुवावे लागलील.
पुण्यातील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण रांचीत परतफेड करीत ६९ धावांनी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यात यश आले. पुण्याच्या गवताळ खेळपट्टीने भारतीय फलंदाजांचे अवसान गळाले. रांचीतील मंद खेळपट्टीवर मात्र भारतीय खेळाडूंना उत्तम ताळमेळ साधण्यात यश आले होते.
भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.
श्रीलंका :
दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना.
 

Web Title: India's first bowling by winning toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.