पहिला दिवस भारताचा

By admin | Published: January 21, 2016 03:26 AM2016-01-21T03:26:05+5:302016-01-21T03:26:05+5:30

मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, अजय जयराम, शुभंकर डे, बी. साईप्रणीत, समीर वर्मा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात

India's first day | पहिला दिवस भारताचा

पहिला दिवस भारताचा

Next

पेनांग : मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, अजय जयराम, शुभंकर डे, बी. साईप्रणीत, समीर वर्मा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली. दुहेरीतही ज्वाला व अश्विनी या जोडीने विजयी सुरुवात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेनंतर दोन आठवड्यांतच या ग्रां. प्रि. स्पर्धेला सुरुवात झाली. सिंधूने स्वित्झर्लंडच्या कबरिना जाकेटवर २१-१७, २१-१६ अशी मात केली. तर श्रीकांतने मलेशियाच्या वेइ फेंग चोंगला २१-१७, २१-११ असे नमवून आगेकूच केली.
अजय जयरामने जपानच्या ताकुमा यूएडा याला २१-१९, २१-११; तर जपानच्या १२व्या मानांकित शो ससाकी याला समीर वर्मा याने २१-१८, २१-१८ असे पराभूत केले. साईप्रणीतने मलेशियाच्या शाहजान शाह मिसफाहुलवर २१-१३, २१-१५, तर शुभंकर डे याने थायलंडच्या केंटाफोन वांगचारोएनवर २१-१९, २१-१६ असा विजय मिळविला.
दुहेरीत ज्वाला व अश्विनी यांनी मलेशियाच्या मेई कुआन चो व ली मेंग यिआन या जोडीवर २१-१४, १४-२१, २५-२३ अशी मात करून दुसरी
फेरी गाठली.

Web Title: India's first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.