भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:07 AM2018-03-04T02:07:21+5:302018-03-04T02:07:21+5:30

पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या भारतीय जोडीने माघारल्यानंतरही मुसंडी मारताना अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करीत पहिल्या आयबीएसएफ स्नूकरचे सांघिक विश्वविजेतेपद पटकविले.

India's first ever snooker title, Pakistan's winning sound | भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय

googlenewsNext

दोहा : पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या भारतीय जोडीने माघारल्यानंतरही मुसंडी मारताना अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करीत पहिल्या आयबीएसएफ स्नूकरचे सांघिक विश्वविजेतेपद पटकविले.
काल रात्री झालेल्या ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ फ्रेममध्ये ०-२ ने माघारल्यानंतर मनन चंद्राने तिस-या फ्रेममध्ये भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. पंकजने शानदार कामगिरी करीत विजय मिळवून दिला. चौथ्या फ्रेममध्ये बाबर मसिह विरुद्ध अडवाणी संकटात सापडला होता. त्यानंतरही त्याने मुसंडी मारून २-२ अशी बरोबरी साधून दिली. चंद्रा-मोहम्मद आसीफ यांच्यात पाचव्या आणि निर्णायक फ्रेम अनेकदा दोलायमान स्थिती निर्माण झाली. पण संयमी खेळ करणाºया भारतीय खेळाडूने मोक्याच्या क्षणी विजय मिळवून दिला.
दुहेरी लढतीत अडवाणी-चंद्रा यांनी बाजी मारली. त्यानंतर एकेरीचे दोन्ही फ्रेम जिंकून जेतेपद खेचून आणले. या विजयासह अडवाणीच्या विश्वविजेते पदाची संख्या १९ झाली आहे. (वृत्तसंस्था)

अडवाणीचा शानदार खेळ
फायनलमध्ये भारताची सुरुवात खराब झाली. बाबरने पहिल्या फ्रेममध्ये चंद्रावर ७३-२४ असा सोपा विजय मिळविला. आसीफने अडवाणीला ६१-५६ ने नमवून पाकला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुहेरीत अडवाणीने चंद्राच्या साथीने पाकिस्तानला नमवले.

Web Title: India's first ever snooker title, Pakistan's winning sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा