Asian Games : बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्याविरोधात वर्ल्ड चॅम्पियनची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:21 PM2023-07-19T12:21:22+5:302023-07-19T12:21:54+5:30
Asian Games : भारतीय कुस्ती सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे...
Asian Games : भारतीय कुस्ती सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे... भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक आरोपांवरून कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर केलेले आंदोलन, त्यानंतर झालेला पोलिसांचा लाठीमार अन् खेळाडूंची पदक विसर्जित करण्याची भाषा, यामुळे जागतिक स्तरावर भारतीय कुस्तीची मान शरमेने नक्की खाली गेली. कुस्तीपटूंच्या लढ्याला काहीअंशी यश मिळालं आहे आणि आता खेळाडू पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. पण, आता कुस्तीपटूंमध्येच दंगल सुरू झालेली पाहायला मिळतेय. आगामी आशियाई स्पर्धेकरिता बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना ट्रायल शिवाय थेट स्पर्धेत पाठवण्यात येणार असल्याची बातमी आली अन् वाद पुन्हा कोर्टापर्यंत गेला.
२० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू अंतिम पांघल हिने बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांना थेट प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. अंतिम म्हणाली, विनेश फोगाटने मागील एका वर्षात काहीच मोठी कामगिरी केलेली नाही, मग तिला थेट प्रवेश का? राष्ट्रकुल स्पर्धेतही तिच्याविरोधात मी ३-३ बाऊट खेळले होते आणि त्यातही चिटींग झाली होती. आता तिला थेट प्रवेश न देता ट्रायल घ्यायला हवी आणि त्यात कोणत्याच प्रकारची चिटींग नकोय.''
#WATCH | Wrestler Antim Panghal says, "Vinesh (Phogat) is being sent directly, she doesn't have any achievements in the last one year but despite that, she is being sent directly. Even in the Commonwealth Games trial, I had a 3-3 bout with her. Then too, I was cheated...A fair… https://t.co/X6b5LzOuydpic.twitter.com/gdVKPdd0Bq
— ANI (@ANI) July 19, 2023
कुस्तीपटू विशाल कालीरामन म्हणतो, "मी देखील ६५ किलोपेक्षा कमी वजनाच्या गटात खेळतो आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बजरंग पुनियाला कोणत्याही चाचणीशिवाय थेट प्रवेश देण्यात आला आहे. ते आता एक वर्षापासून आंदोलन करत आहेत, तर आम्ही सराव करत आहोत. आम्हाला कोणाचीही उपकार किंवा फायदा नको आहे. किमान ट्रायल घ्यावी अन्यथा आम्ही कोर्टात जाण्यास तयार आहोत. आम्ही कोर्टात दाद मागू. आम्ही १५ वर्षांपासून सराव करत आहोत. .जर बजरंग पुनियाने नकार दिला की तो आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार नाही तरच दुसऱ्याला संधी मिळेल."
#WATCH | Delhi: Wrestler Vishal Kaliraman says, "Even I play in the under 65kg category and for the Asian Games Bajrang Punia has been given direct entry without any trial. They have been staging a protest for a year now, while we have been practising. We appeal for a trial... We… https://t.co/X6b5LzOuydpic.twitter.com/IOSmRDlXFR— ANI (@ANI) July 19, 2023