Amrinder Singh Twitter Handle: 'मी तो अमरिंदर नाही'! कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:40 PM2021-09-30T13:40:47+5:302021-09-30T14:21:32+5:30

Amrinder Singh confusion: पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते.

India's goalkeeper Amrinder Singh is in problem Punjab Congress crisis, Appeal to media for no tagging | Amrinder Singh Twitter Handle: 'मी तो अमरिंदर नाही'! कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला 

Amrinder Singh Twitter Handle: 'मी तो अमरिंदर नाही'! कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला 

Next

Amrinder Singh Twitter Handle: पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. यामुळे एकेकाळचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. आता दोन्ही सिंग ट्रेंडिंगमध्ये आहेत. परंतू याचा त्रास एका फुटबॉल प्लेअरला सहन करावा लागत आहे. (Indian National Football team goalkeeper Amrinder Singh is in problem Punjab Congress crisis.)

अमरिंदर सिंग असे त्याचे नाव असल्याने त्याला टॅग करून लोक ट्विट करू लागले आहेत. राजकारणात आहे तो अमरिंदर कोण हेच लोकांना कळत नसल्याने @ नंतर अमरिंदर टाकले की लोक त्यालाही टॅग करू लागले आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने लोकांसमोर हात जोडले आहेत. 
हा खेळाडू भारतीय फुटबॉल टीमचा गोलकिपर अमरिंदर सिंग आहे. या अमरिंदरला मीडिया हाऊसदेखील टॅग करत आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने ट्विट करत लिहिले आहे की, मी अमरिंदर सिंग आहे, भारतीय फुटबॉल टीमचा गोलकीपर. पंजाबचा मुख्यमंत्री नाही. न्यूज मीडिया पत्रकारांनी मला टॅग करणे बंद करावे, असे आवाहन केले आहे. 

गोलकीपर अमरिंदर सिंगचे ट्विटर हँडल  @Amrinder_1 आहे. तर कॅप्टन अमरिंदर यांचे ट्विटर हँडल @capt_amarinder आहे. लोक यावरून कन्फ्यूज झाले आहेत. 

कॅप्टन अमरिंदर सिंगांनी शाहांनंतर घेतली डोवालांची भेट
अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते. परंतू तेवढ्यातच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने एक दिवस उशिरा शाहांची भेट घेण्याचा निर्णय कॅप्टननी घेतला. पंजाबमध्ये सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले होते. विरोधी आमदारांना गोळा करून त्यांनी कॅप्टनना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावले होते. तेव्हा कॅप्टननी सिद्धू यांचे पाकिस्तानशी घनिष्ट संबंध असून ते आपल्याला महागात पडतील असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला होता. े

Web Title: India's goalkeeper Amrinder Singh is in problem Punjab Congress crisis, Appeal to media for no tagging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.