श्रीलंकेविरूद्ध भारताची चांगली सुरूवात, विजयी चौकार मारण्याचं लक्ष्य

By admin | Published: July 5, 2017 05:23 PM2017-07-05T17:23:10+5:302017-07-05T17:23:10+5:30

सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावला असून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही संघाने आश्वासक सुरूवात

India's good start against Sri Lanka, the goal of winning the winning fours | श्रीलंकेविरूद्ध भारताची चांगली सुरूवात, विजयी चौकार मारण्याचं लक्ष्य

श्रीलंकेविरूद्ध भारताची चांगली सुरूवात, विजयी चौकार मारण्याचं लक्ष्य

Next
>ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 5 - सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावला असून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही संघाने आश्वासक सुरूवात केली आहे. 33.3 षटकांमध्ये दोन गड्यांच्या मोबदल्यात भारताने 133 धावा केल्या आहेत. या लढतीत विजय मिळवूत उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करण्याचा भारताचा निर्धार आहे. 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणा-या भारताची सुरूवात चांगली झाली नाही. भारताच्या सलामीच्या जोडीने आज निराशा केली. धडाकेबाज स्म्रिती मंधाना केवळ 8 धावांवर स्वस्तात बाद झाली तर पुनम राऊतही 16 धावांवर बाद झाली. पण त्यानंतर दिप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राजने डाव सावरला आहे. दिप्ती शर्मा(63) अर्धशतक फटकावून नाबाद खेळत आहे तर मिताली राजही 43 धावांवर नाबाद आहे.   
(कोणता क्रिकेटर आवडतो विचारणा-या पत्रकाराला मिताली राजचं "कडक" उत्तर)
(स्मृती मंधानाला "सेहवाग व्हर्जन" म्हणणा-या चाहत्याला विरूने सुनावलं)
(मी मुलीमध्ये माझे क्रिकेट पाहतो)
(दस का दम, भारताकडून पाकिस्तान ९५ धावांनी पराभूत)
 
फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जात आहे. श्रीलंका संघाची आतापर्यंतची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांना तीनही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
फॉर्मचा विचार करता भारताने गेल्या चारही वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका जिंकलेल्या आहेत. भारतीय संघाने या वाटचालीमध्ये मायदेशात श्रीलंका व विंडीजचा व्हाइटवॉश केला, तर दक्षिण आफ्रिकेला विश्वकप पात्रता स्पर्धा व चौरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत पराभवाचा तडाखा दिला. विश्वकप स्पर्धेत भारताने तिन्ही राऊंड रॉबिन लढतींमध्ये विजय मिळवला. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
 
भारताने सलामी लढतीत यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. त्यानतंर दुसऱ्या लढतीत विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत ९५ धावांनी विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांत सहा गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
 
पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टने १० षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत, प्रतिस्पर्धी संघाचा डाव ३८.१ षटकांत ७४ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मधल्या षटकांमध्ये दीप्ती शर्माने अचूक मारा केला. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांचीही गोलंदाजी उल्लेखनीय ठरली.
 
वन-डे इतिहासात आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या झुलन गोस्वामीला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, पण पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा भार तिच्याच खांद्यावर राहणार आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना शानदार फॉर्मात आहे. कर्णधार मिताली राज व पूनम राऊत यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंका संघ विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा करीत आहे. श्रीलंकेला सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध ९ गड्यांनी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध ८ गड्यांनी आणि इंग्लंडविरुद्ध ७ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंका संघाला फलंदाजीमध्ये सर्वाधिक आशा चामरी अटापट्टूकडून आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध ५३ तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७८ धावांची खेळी केली होती. पण संघाला विजय मिळवून देण्यात तिचे प्रयत्न अपुरेच पडले.

Web Title: India's good start against Sri Lanka, the goal of winning the winning fours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.