भारताची पकड

By admin | Published: July 12, 2014 12:55 AM2014-07-12T00:55:21+5:302014-07-12T00:55:21+5:30

ईशांत शर्मा (3-64), मोहम्मद शमी (2-58) व भुवनेश्वर कुमार (4-61) यांच्या अचुक मा:याने इंग्लंडला हैराण केले. त्यांच्या या कामगिरीच्या बळावर भारताकडे 1क्5 धावांची आघाडी आहे.

India's grip | भारताची पकड

भारताची पकड

Next
अजय नायडू - नॉटिंघम
ईशांत शर्मा (3-64), मोहम्मद शमी (2-58) व भुवनेश्वर कुमार (4-61) यांच्या अचुक मा:याने इंग्लंडला हैराण केले. त्यांच्या या कामगिरीच्या बळावर भारताकडे 1क्5 धावांची आघाडी आहे. 
भारताच्या 457 धावांची आघाडी भरून काढण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला तिस:या दिवशी 9 बाद 352 धावांवर समाधान मानावे लागले. भारताची आघाडी निश्चित झाली असली तरी जो रुट (71*) आणि जेम्स अॅण्डरसन (23*) यांनी शेवटच्या विकेटसाठी तंगवले. या दोघांनी दहाव्या विकेट्ससाठी 54 धावांची भागीदारी करून भारताला आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याचा इशारा दिला. 
कालच्या 1 बाद 43 धावांवरून आज सुरूवात करताना इंग्लंडने सावध खेळावरच भर दिला. रॉबसन आणि गॅरी बॅलेंस यांनी 125 धावांची भागीदारी करून इंग्लंडला सावरले. रॉबसन आणि बॅलेंस यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. बॅलेन्स व रॉबसन यांनी संयमी फलंदाजी करीत यजमान संघाला उपाहारार्पयत 1 बाद 131 धावांची मजल मारुन दिली. भारताच्या युवा गोलंदाजा तिस:या दिवशी आभ्राच्छादीत वातावरणाचा पहिल्या सत्रत लाभ घेता आला नाही.   उपहारानंतरच्या सत्रत भारतीय गोलंदाजांनी वादळ आणले. दोन्ही वेल सेट फलंदाजांना इशांत शर्माने पायचीत केले. इयान बेल (25) यालाही शर्माने स्वस्तात बाद करून इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्यानंतर क्रमाक्रमाने यजमानांच्या विकेट्स पडत होत्या. माईन अली (14), मॅट प्रायर (5), बेन स्टोक (क्) यांना शमी व कुमार या जोडीने बाद केले. 2 बाद 134 धावा अशा मजबूत स्थितीत असलेला इंग्लंडचा डाव पाहता क्षणी 7 बाद 2क्2 धावा असा गडगडला. अशा परिस्थितीत रुट एका बाजूने खिंड लढवत होता. आठव्या विकेट्ससाठी आलेल्या ब्रॉडने त्याला चांगली साथ दिली. या जोडीने 13.5 षटके खेळून काढत 78 धावांची भागीदारी केली आणि पुन्हा इंग्लंडच्या आशा पल्लवीत केल्या. यावेळी कुमारने ब्रॉडला पायचीत करून या जोडीला ब्रेक लावला. त्यापाठोपाठ कुमारने प्लंकेटलाही बाद केले, परंतु अॅण्डरसनने दहाव्या विकेटसाठी रुटसह अखेर्पयत खिंड लढवली. या जोडीने  इंग्लंडला दिवसअखेर 9 बाद 352 धावा अशी मजल मारून दिली.
 
च्भारत पहिला डाव 457
च्इंग्लंड पहिला डाव : अॅलिस्टर कुक त्रि. गो. शमी क्5, सॅम रॉबसन पायचित गो. ईशांत 59, गॅरी बॅलन्स पायचित गो. ईशांत 71, इयान बेल ङो. धोनी गो. ईशांत 25, जो रुट खेळत आहे 78, मोईन अली ङो. धवन गो. शमी 14, मॅट प्रायर ङो. धोनी गो. भुवनेश्वर क्5, बेन स्टोक्स ङो. धोनी गो. भुवनेश्वर क्क्, स्टुअर्ट ब्रॉड पायचीत गो. भुवनेश्वर 47, लिअॅम प्लंकेट त्रि. गो. भुवनेश्वर 7, जेम्स अॅण्डरसन खेळत आहे 23. अवांतर (18). एकूण 1क्6 षटकांत 9 बाद 352. बाद क्रम : 1-9, 2-134, 3-154, 4-172, 5-197, 6-2क्2, 7-2क्2, 8-28क्, 9-298. गोलंदाजी : भुवनेश्वर 25-8-61-4, शमी 24-3-98-2, ईशांत 27-3-1क्9-3, जडेजा 24-4-56-क्, 
बिन्नी 6-क्-22-क्.

 

Web Title: India's grip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.