भारताची हॅट्ट्रिकची आशा धुळीस

By admin | Published: October 18, 2015 11:14 PM2015-10-18T23:14:39+5:302015-10-18T23:14:39+5:30

ब्रिटनने दोन वेळेचा गत चॅम्पियन भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाला रविवारी सडन डेथमध्ये ४-३ असे पराभूत करताना पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धा जिंकली.

India's hat-trick's hopes slowdown | भारताची हॅट्ट्रिकची आशा धुळीस

भारताची हॅट्ट्रिकची आशा धुळीस

Next

जोहोर बाहरू : ब्रिटनने दोन वेळेचा गत चॅम्पियन भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाला रविवारी सडन डेथमध्ये ४-३ असे पराभूत करताना पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धा जिंकली.
ब्रिटनने साखळी सामन्यात भारताला ४-३ असे पराभूत केले होते आणि अंतिम सामन्यातदेखील हीच स्थिती राहिली. या विजयाबरोबर ब्रिटनने गत वर्षी भारताकडून अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला आणि भारताला विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून वंचित ठेवले.
निर्धारित वेळेत ही लढत २-२ अशी बरोबरीत राहिली. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्येही २-२ अशी बरोबरी राहिली. त्यामुळे सामन्याच्या निर्णयासाठी सडन डेथचा आधार घ्यावा लागला. त्यात ब्रिटनने बाजी मारताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील विजेतेपदाची लढत खूपच रोमहर्षक आणि संघर्षपूर्ण ठरली. दोन्ही संघांनी जबरदस्त आक्रमण आणि बचाव यात सारखाच मुकाबला केला. ब्रिटनने चौथ्या मिनिटाला ल्यूक टेलरने पेनल्टी कॉर्नवर केलेल्या गोलच्या बळावर आघाडी मिळवली; परंतु हरमनप्रीतसिंह याने १२ व्या मिनिटाला गोल करीत भारताला बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये गुरजंतसिंहने ४१ व्या मिनिटाला शानदार गोल करताना भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली; परंतु चारच मिनिटांनी जॅक टनर याने त्याचा स्पर्धेतील पहिला गोल नोंदवताना ब्रिटनला २-२ अशी बरोबरी साधून दिली.
निर्धारित वेळेत स्कोर बरोबर राहिल्यानंतर पेनल्टी शूट आऊटचा आधार घ्यावा लागला. पेनल्टी शूट आऊटमध्ये हरजितसिंह आणि हरमनप्रीतसिंह यांनी गोल केले, तर परविंदरसिंह, गुरजंतसिह आणि नीलकांत शर्मा हे गोल करू शकले नाहीत. त्यानंतर सामना सडन डेथमध्ये पोहोचला.
हरजितने भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, तर ल्यूक टेलरने ३-३ अशी ब्रिटनला बरोबरी साधून दिली. पुढच्या प्रयत्नात परविंदसिंहला गोल करता आला नाही आणि जॅक क्ली याने गोल
करीत ब्रिटनच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी
यजमान मलेशियाने अर्जेंटिनाला पराभूत करीत कास्यपदक जिंकले, तर आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५-0
असा धुव्वा उडवत पाचवे स्थान मिळवले. पाकिस्तानी संघ
सहाव्या आणि अखेरच्या स्थानी फेकला गेला. (वृत्तसंस्था)

Web Title: India's hat-trick's hopes slowdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.