भारताचा हार्दिक विजय

By admin | Published: March 23, 2016 11:19 PM2016-03-23T23:19:20+5:302016-03-24T00:10:18+5:30

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एका धावाने पराभव करत टी २० विश्वचषकात आपले आव्हान जिंवत ठेवले. या पराभमुळए बांगलादेशचे टी २० विश्वचषकातील आव्हान संपले आहे.

India's heartbreaking victory | भारताचा हार्दिक विजय

भारताचा हार्दिक विजय

Next

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. २३ - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एका धावाने पराभव करत टी २० विश्वचषकात आपले आव्हान जिंवत ठेवले. या पराभमुळए बांगलादेशचे टी २० विश्वचषकातील आव्हान संपले आहे. भारताने बांगलादेशला दिलेले १४७ धावांचे आव्हान पार करताना बांगलादेशने भारताला झुंजवले. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले. त्यांने टाकलेल्या शेवटच्या षटकात फक्त बांगलादेश संघाला १० धावाच काढता आल्या. पांड्याच्या या षटकात ३ फलंदाज बाद झाले तर २ चौकार गेले. १ चेंडूत २ धावांची गरज असताना पांड्याने चेंडू निर्धाव टाकत भारताला १ धावांने विजय मिळवून दिला.
 
हार्दिक पंड्यानं टाकलेलं अखेरचं षटक चांगलंच नाट्यमय ठरलं. महमुदुल्लानं या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव काढली, मग दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मुश्फिकउर रहीमनं चौकार ठोकले. अखेरच्या तीन चेंडूंमध्ये बांगलादेशला विजयासाठी अवघ्या दोन धावांची गरज होती. पण मुश्फिउर रहीम आणि महमुदुल्ला लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाले. मग अखेरच्या चेंडूवर धोनीनं मुस्ताफिजूर रहमानला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
या विजयाबरोबरच भारताने बांगलादेशला हरवून विजयाचे रंग उधळले आणि होळी साजरी केली.  भारतातर्फे अश्विन, जडेजा आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी २ बळी मिळवले. बांदलादेश तर्फे तम्मीम इक्कबाल ने ३५ धावांचे योगदान दिले, तर मोक्याच्या वेळी मेहमुद्दुला आणि शाकिबने भारतीय गोलंदाजी फोडून काढली होती. पण मोक्याच्या वेळी भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगीरी करत विजय हिराऊन आणला.
 
त्यापुर्वी, बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्नात असलेल्या भारताने बांगलादेशला २० षटकात १४७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारताने सात बाद १४६ धावा केल्या. 
फलंदाज रोहित शर्मा १८ धावा काढून बाद झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेचच शिखर धवन तंबूत परतल्याने पाठोपाठ दुसरा धक्का बसला. शिखर धवनने २३ धावा काढल्या. तर, आक्रमक फलंदाज विराट कोहलीही जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. त्याला २४ धावांवर बांगलादेशचा गोलंदाज शुवागता होमने यष्टीचीत केले. 
या सामन्यात सुरेश रैनाने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावत ३० धावा केल्या. सुरेश रैना झेलबाद झाल्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याही १२ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्यांचा झेल सौम्या सरकारने घेतला. तर युवराज सिंग अवघ्या ३ धावा काढून तंबूत परतला. रविंद्र जडेजा १२ धावांवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद १३ धावा केल्या, तर आर. आश्विनने पाच धावा केवल्या. 
बांगलादेशकडून गोलंदाज अल अमीन हुसेन आणि मुस्तफिजुर रहमानने यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले, तर शुवागता होम,  महमदुल्ला आणि शाकीबुल हसन यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले. 

Web Title: India's heartbreaking victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.