चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत "हिरो" तर बांगलादेश ठरलाय "झिरो"

By admin | Published: May 26, 2017 07:37 AM2017-05-26T07:37:03+5:302017-05-26T09:11:30+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाल्यापासून आजतागत बांगलादेश, इंग्लंड आणि पाकिस्तानला एकदाही या ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही...

India's "Hero" in Champions Trophy, Bangladesh's "Zero" | चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत "हिरो" तर बांगलादेश ठरलाय "झिरो"

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत "हिरो" तर बांगलादेश ठरलाय "झिरो"

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - यंदा आयसीसीच्या आठव्यांदा रंगणाऱ्या स्पर्धेत क्रमवारीत अव्वल आठ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघाचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. 1 जूनपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी गतविजेता भारतीय संघ ब गटात खेळताना दिसणार असून या गटात त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असेल.

तर अ गटात इंग्लड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते. 1998 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बांगलादेश, इंग्लंड आणि पाकिस्तानला एकदाही या ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोन वेळा हा चषक पटकावला आहे. 1998 पासून या स्पर्धेत कोणत्या संघाने किती सामने खेळले? किती जिंकले?  हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आपण जाणून घेऊयात या संपूर्ण स्पर्धेत कोणत्या संघाने किती सामने जिंकले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशचे प्रदर्शन खूपच खराब आहे. बांगलादेशने चॅम्पियन्स स्पर्धेत आठ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे तर सात सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. बांगलादेशनंतर या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरीही निराशजनक आहे. पाकिस्तानने 18 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना 11 पराभव स्वीकारावे लागले आहेत. तर फक्त सात सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. क्रिकेटची सुरवात करणाऱ्या साहेबांचीही अशीच काहीशी अवस्था आहे.

 (11 वर्षानंतर हा खेळाडू खेळणार "चॅम्पियन्स ट्रॉफी"त) 

 

इंग्लंडने या स्पर्धेत 21 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 11 विजय आणि 10 पराभव स्वीकारावे लागले आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि इंग्लंड यांना ही स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही. द. आफ्रिकेने या स्पर्धेत 21 सामने खेळले आहेत. यामध्ये 11 विजय आणि 9 पराभव झाले आहेत. तर एक सामना टाय झाला होता. दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये झालेली पहिली चॅम्पिय़न्स ट्रॉफी जिंकली होती.

 

नूझीलंडने या स्पर्धेत खेळलेल्या 21 सामन्यातील 12 सामन्यात विजय मिळवला आहे. आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर एक सामना टाय झाला आहे. न्यूझीलंडने दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

(चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी संघ आणि त्यांची कामगिरी)

आठव्या चॅम्पियन्स स्पर्धेत वेस्ट इंडिज खेळत नसला तरी या स्पर्धेत त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. वेस्ट इंडिजने या स्पर्धेत 24 सामने खेळले आहेत. यामध्ये 13 विजय आणि 10 पराभव झाले आहेत. तर एक सामना टाय झालेला आहे. 2002मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते झाले होते. या स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघात श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत त्यांनी 24 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 13 जिंकले आहेत तर 9 सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. श्रीलंकेचे दोन सामने टाय झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम गतविजेत्या भारतीय संघाच्या नावावर आहे. या स्पर्धेत भारताने खेळलेल्या 24 सामन्यात 15 विजय मिळवले आहेत. या स्पर्धेत भाराताला सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर तीन सामने टाय झाले आहेत. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर दोन वेळा नाव कोरले आहे.

Web Title: India's "Hero" in Champions Trophy, Bangladesh's "Zero"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.