कडक सॅल्युट! अवघ्या १३.०९ सेकंदात १०० मीटर पार; भारताच्या लेकीची 'सोनेरी' कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 05:36 PM2023-07-13T17:36:24+5:302023-07-13T17:37:45+5:30
asian athletics championships 2023 : भारताची धावपटू ज्योती याराजीने इतिहास रचला आहे.
jyothi yarraji world athletics : भारताची धावपटू ज्योती याराजीने इतिहास रचला आहे. तिने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. बॅंकॉकमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत ज्योतीने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ही किमया साधली.
Good day. Jyothi Yarraji wins first gold for India in women’s 100m hurdles. She clocks 13.09 secs.
— Athletics Federation of India (@afiindia) July 13, 2023
2023 Asian Athletics Championships in Bangkok. pic.twitter.com/Nm5eRfxvdj
२३ वर्षीय धावपटूने अवघ्या १३.०९ सेकंदात १०० मीटर अंतर गाठून सोनेरी कामगिरी केली. तिच्या पाठोपाठ (१३.१३ सेकंद) जपानची धावपटू तेरडा असुका आणि ओकी मासुमी (१३.२६ सेकंद) होती. दरम्यान, महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताने हे पहिलेच सुवर्ण पदक जिंकले आहे.
@JyothiYarraji bags the 1⃣st🥇for 🇮🇳 at the ongoing Asian Athletics Championships 2023 🥳
— SAI Media (@Media_SAI) July 13, 2023
The #TOPSchemeAthlete clocked a time of 13.09s in Women's 100m Hurdles Event.
Meanwhile, her counterpart Nithya Ramaraj clocked 13.55s & finished 4⃣th at the event. pic.twitter.com/WPGCcHHoOM