भारताला विंडीज एकादशविरुद्ध आघाडी

By admin | Published: July 16, 2016 02:35 AM2016-07-16T02:35:18+5:302016-07-16T02:35:18+5:30

फार्मात असलेला लोकेश राहुलचे सलग दुसरे अर्धशतक व त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत (५१) केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड अध्यक्ष

India's lead against the West Indies XI | भारताला विंडीज एकादशविरुद्ध आघाडी

भारताला विंडीज एकादशविरुद्ध आघाडी

Next

बासेटेरे : फार्मात असलेला लोकेश राहुलचे सलग दुसरे अर्धशतक व त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत (५१) केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध तीन दिवसीय सराव सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी उपाहापर्यंत पहिल्या डावात आघाडी घेतली.
पहिल्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यानंतर रिटायर्ड होत पॅव्हेलियनमध्ये परतलेला राहुल यावेळीही ६४ धावा काढून रिटायर्ड झाला. शुक्रवारी अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने ६ बाद २५० धावांची मजल मारली होती. त्यावेळी २९ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या अजिंक्य रहाणे याला वृद्धिमान साहा (१६) साथ देत होता.
राहुलच्या ६४ धावांच्या खेळीत ९ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. कोहलीने ४ चौकारांच्या साहाय्याने ५१ धावांची खेळी केली. कालच्या ३ बाद ९३ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने उपाहारापर्यंत २७.५ षटकांत गडी न गमावता ८८ धावांची भर घातली होती.
त्याआधी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा यांच्या भेदक फिरकीच्या बळावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज बोर्ड एकादशला पहिल्या डावात केवळ १८० धावांत गुंडाळले. पहिला दिवस फिरकीपटूंनी गाजविला.जडेजाने १३ षटकांत १६ धावांत ३, अश्विनने १९.५ षटकांत ६२ धावांत ३ आणि मिश्राने १० षटकांत ४५ धावांत २ गडी बाद केले. यजमान संघ ६२.५ षटकांत बाद झाला.(वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज बोर्ड एकादश : पहिला डाव ६२.५ षटकांत सर्वबाद १८० धावा (कॉर्नवेल ४१, ब्लॅकवुड ३६, कॅम्पबेल ३४,अश्विन ६२/३, जडेजा १६/३, मिश्रा ४५/२). भारत पहिला डाव : ७५ षटकांत ६ बाद २५० धावा.(मुरली विजय २३, केएल राहुल ६४, विराट कोहली ५१, रहाणे नाबाद २९, वृद्धिमान साहा नाबाद १६, कॉर्नवेल ३-८०, होल्डर, डावेस, प्रत्येकी एक बळी.)

Web Title: India's lead against the West Indies XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.