भांबरीकडे भारताचे नेतृत्व
By admin | Published: October 16, 2015 11:52 PM2015-10-16T23:52:00+5:302015-10-16T23:52:00+5:30
देशाचा अव्वल एकेरी टेनिसपटू युकी भांबरी पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या एटीपी एअर आशिया टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
बंगळुरू : देशाचा अव्वल एकेरी टेनिसपटू युकी भांबरी पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या एटीपी एअर आशिया टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत युकीसोबतच पाच इतर भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉमध्ये सहभागी आहेत. ज्यात सोमदेव देवबर्मन, साकेत मिनैनी, सनम सिंह, राजकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांचासमावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत अव्वल शंभर खेळाडूंमध्ये युकी भांबरी ‘टॉप’ मानांकनावर असेल. त्याच्यानंतर स्पेनचा आद्रियान मेनेदेज मासिरस (१३७) आणि इंग्लंडचा जेम्स वार्ड (१५७) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असतील.
केएसएलटीएचे खजिनदार बी.एन.एस. रेड्डी म्हणाले की, स्पर्धेचे आयोजन १२ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर होत आहे. पात्रता फेरीची सुरुवात शनिवारपासून होईल. स्पर्धेतून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्याची चांगली संधी आहे. स्पर्धेत सहा भारतीय खेळाडू असल्याने रोमांचकता असेल. टेनिस संघाचे (एआयटीए) संयुक्त सचिव सुंदर राजू म्हणाले की, स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून अव्वल ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवतील.