भारताचे मिशन टॉप थ्री

By admin | Published: July 23, 2014 03:39 AM2014-07-23T03:39:58+5:302014-07-23T03:39:58+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेत 101 पदके जिंकणारे भारतीय पथक 23 जुलैपासून सुरू होणा:या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत अव्वल तीन देशांत जागा मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़

India's Mission Top Three | भारताचे मिशन टॉप थ्री

भारताचे मिशन टॉप थ्री

Next
ग्लास्गो : दिल्लीत झालेल्या 2010 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत 101 पदके जिंकणारे भारतीय पथक 23 जुलैपासून सुरू होणा:या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत अव्वल तीन देशांत जागा मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़ या स्पर्धेत भारताचे 224 खेळाडू विविध खेळांत आपले नशीब अजमावणार आहेत़ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड गत स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल़ 
भ्रष्टाचार आणि स्पर्धेच्या तयारीसाठी झालेला उशीर या आरोपानंतर 2क्1क् च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने प्रभावी कामगिरी केली होती़ या स्पर्धेत भारताने पदक तालिकेत ऑस्ट्रेलियानंतर दुसरा क्रमांक मिळविला होता़ दिल्लीतील राष्ट्रकुलनंतर याच वर्षी चीनमधील ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी विक्रमी प्रदर्शन करून 65 पदके जिंकली होती़ त्याच्या दोन वर्षानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके पटकावली होती़
राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत बिंद्रा, नारंग, विजयकुमार, हिना सिद्धू यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आह़े कुस्तीत सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि हॉकीत पुरुष किंवा महिला संघाकडून पदकाची अपेक्षा असेल़ 
अॅथलेटिक्समध्ये गत वर्षी 2 सुवर्णासह 12 पदके मिळविली होती़ आता थाळीफेकीत पुनिया आणि पुरुष गटात विकास गौडा यांच्या कामगिरीवर नजर राहील़ बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल खेळणार नसल्यामुळे पी़ व्ही़ सिंधू, पी़ कश्यप, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा पदकांच्या दावेदार मानल्या जात आहेत़ भारोत्तलनात गत वर्षी भारताने 8 पदके मिळविली होती़ या वेळी भारताच्या खात्यात जास्त पदके जातील, अशी आशा आह़े मुष्टियुद्ध स्पर्धेत मनोजकुमार, विजेंदरकुमार, तर टेबल टेनिसमध्ये अचंता शरत कमलकडून पदकाची अपेक्षा आह़े जिम्नॅस्टिक्समध्ये आशिषकुमार पदक मिळवू शकतो़ 
2क् व्या राष्ट्रकुल स्पर्धेची औपचारिक सुरुवात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते बुधवारी सेल्टिक पार्क येथे होईल, तर उद्घाटन सोहळ्यात ग्रॅमी पुरस्कार विजेता रॉकस्टार रॉड स्टीवर्ट हा मुख्य आकर्षण असणार आह़े (वृत्तसंस्था)
 
विजय कुमार होणार भारताचा ध्वजधारक    
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकणारा विजय कुमार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ध्वजधारक राहणार आहे. भारतीय दलाचे प्रमुख राज सिंह यांनी विजय कुमारच्या नावाची घोषणा ग्लास्गो येथे केली. नेमबाज खेळाडू ध्वजधारक होण्याची ही दुसरी वेळ आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणा:या योगेश्वर दत्ताला राखीव ठेवण्यात आले आहे. 
 
4राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरे स्थान मिळविण्याचे भारताचे लक्ष्य राहणार आह़े कारण ज्या प्रकारे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांनी स्पर्धेसाठी तयारी केली आह़े त्यावरून हे संघ पदकतालिकेत अव्वल स्थानावर राहण्याची शक्यता आह़े ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धेनंतर सर्वात महत्त्वाची मानली जाणारी ही राष्ट्रकुल स्पर्धा 11 दिवस चालणार आह़े भारताचे खेळाडू 14 खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील़ 
4या स्पर्धेत धनुर्विद्या, टेनिस आणि ग्रीको रोमन कुस्तीचा समावेश नाही़ त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या पदकांच्या आशेला धक्का पोहोचला आह़े कारण गत स्पर्धेत याच खेळांमध्ये भारताने प्रभावी कामगिरी करून पदके आपल्या नावे केली होती़ दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविणा:या 3क् खेळाडूंचा ग्लास्गोतील स्पध्रेत समावेश आह़े त्यात अभिनव बिंद्रा, गगन नारंग, विजेंद्र सिंह, सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, कृष्णा पुनिया, आशिषकुमार, अचंता शरत कमल यांच्यासह अन्य खेळाडूंचा समावेश आह़े 
4ऑस्ट्रेलियाने दिल्लीतील गत राष्ट्रकुल स्पर्धेत 177 पदकांची कमाई केली होती़ त्यात 74 सुवर्णपदकांचा समावेश होता़ या स्पर्धेत इंग्लंडने एकूण 142 पदके पटकावली होती़ त्यात 29 सुवर्णपदकांचा समावेश होता़ मात्र, लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत इंग्लंडने 29 सुवर्ण जिंकून ऑस्ट्रेलियावर वर्चस्व मिळविले होत़े लंडन ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाने 7 सुवर्णपदके मिळविली होती़ ग्लास्गो स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांच्या कामगिरीवर सर्वाची नजर राहील़  
 
राष्ट्रकुल स्पध्रेत सचिन तेंडुलकरची ‘ओपनिंग’ 
4ग्लासगो: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 2क्व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या उद्घाटन समारंभात दमदार ‘ओपनिंग’ करण्यास सज्ज झाला आहे. 24 वष्रे भारतीय क्रिकेटला भरभरून दिल्यानंतर निवृत्त झालेला सचिन युनिसेफचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून या समारंभात उपस्थित राहणार आहे. युनिसेफ हा ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा संघटनेशी संलग्न असून ते येथे लहान मुलांमधील वाढणा:या समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम करणार आहेत.
 
4पण, सचिनच्या उपस्थितीने या समारंभाला चार चाँद लागले आहेत. समारंभात सचिन काही तरी विशेष करणार आहे. थांबा व वाट पाहा, असा सल्ला युनिसेफचे इंग्लंडचे अॅम्बेसेडर लॉर्ड डेविड पुत्तनॅम यांनी दिला आहे. सचिन  संस्थेमार्फत करण्यात येणा:या प्रत्येक कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतो, असेही ते म्हणाले. या समारंभात तेंडुलकर, सर ख्रिस होय आणि सर अॅलेक्स फग्र्युसन यांचा संदेशपर चित्रपट दाखिण्यात येणार असल्याचे समजते.
 
4समारंभातील रंगारंग कार्यक्रम पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठा एलएडी बसविण्यात आला आहे. या वेळी क्विन एलिजाबेथ दुसरी क्विन्स बॅटनवरील संदेश वाचून स्पध्रेचे उद्घाटन करेल. ही बॅटन 71 देशांमधून आणि 248 दिवसांचा प्रवास करून येथे दाखल झाली आहे. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम बुधवारी रात्री 12:3क् वाजता  सुरू होणार आहे. या वेळी इतरही धमाकेदार कार्यक्रम होतील.

 

Web Title: India's Mission Top Three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.