भारताची मदार विराटच्या खांद्यावर
By admin | Published: March 16, 2017 11:50 PM2017-03-16T23:50:22+5:302017-03-16T23:50:22+5:30
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला झालेली दुखापत गंभीर नसून तो सामन्यात खेळणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 - तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला झालेली दुखापत गंभीर नसून तो सामन्यात खेळणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. आज रात्री उशीरा ट्विट करत बीसीसीआयने ही माहिती दिली. यामध्या त्यांनी असे सांगितले की, विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीन विराट सावरला आहे. भारतीय फलंदाजीचा कणा असलेला विराट संघात परत आल्यामुळे भारतीयांची चिंता संपली आहे तर कांगारुच्या चिंतेत वाढ झाली असेल.
भारतीय कर्णधार विराट कोहलीला पहिल्या दिवशी उपाहारानंतर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. उजव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. ४० व्या षटकात डीप मिडविकेटला चौकार रोखण्याच्या प्रयत्नात कोहलीने सूर लगावला. त्या वेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. खांद्याला पकडूनच तो मैदानाबाहेर गेला होता. दुखापतीमुळे कर्णधार विराट मैदानाबाहेर गेल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कर्णधाराची जबाबदारी सांभाळली.
बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरी कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा पर्यत्न असणार आहे. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघाने कर्णधार स्मिथ आणि मॅक्सवेलच्या दीडशतकी भागीदारीच्या बळावर चार बाद 299 धावा केल्या आहेत.