भारताची सलामी पाकविरुद्ध
By admin | Published: June 2, 2016 02:12 AM2016-06-02T02:12:16+5:302016-06-02T19:05:06+5:30
गतविजेत्या भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी खेळेल
Next
लंडन : गतविजेत्या भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी खेळेल. इंग्लंडमध्ये पुढील वर्षी १ ते १८ जून या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होत असून उभय संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले.
भारत-पाक सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील सामने कार्डिफ आणि लंडन येथे खेळविले जातील. भारत-पाक सामन्यापूर्वी आॅस्ट्रेलिया- न्यूझीलंड हा सामना होईल. २००४ आणि २०१३ चा अंतिम सामना खेळणारा यजमान इंग्लंड संघ सलामीचा सामना बांगलादेशविरुद्ध ओव्हलवर खेळणार आहे. याच मैदानावर श्रीलंका-द. आफ्रिका हा सामना होईल.
बरोबर एक वर्षाआधी बुधवारी ओव्हल मैदानावर या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यात तीन बाद फेरीच्या सामन्यांसह एकूण १५ सामने होतील. ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीपर्यंत आघाडीवर असलेल्या आठ संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला. विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला अव्वल मानांकन मिळाले असून अ गटात या संघाशिवाय चौथ्या स्थानावर असलेला न्यूझीलंड, सहावा मानांकित इंग्लंड आणि सातवा मानांकित बांगलादेश संघ आहे. बांगलादेश संघाला २००६ नंतर प्रथमच या स्पर्धेत स्थान मिळाले.
आॅस्ट्रेलियाने २००६ मध्ये भारतात तसेच २००९ मध्ये द. आफ्रिकेत
ही स्पर्धा जिंकली होती. न्यूझीलंडने २००० मध्ये ही स्पर्धा जिंकली
आहे. (वृत्तसंस्था)भारत ब गटात असून याच गटात तिसरा मानांकित द. आफ्रिका, पाचवा मानांकित श्रीलंका आणि आठवा मानांकित पाकिस्तान संघाचा समावेश आहे. दोन्ही गटांतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य लढती १४ आणि १५ जून रोजी क्रमश: कार्डिफ, तसेच एजबॅस्टन येथे होतील. अंतिम सामना ओव्हलवर १८ जून रोजी खेळविण्यात येईल. इंग्लंड तिसऱ्यांदा स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. घरच्या मैदानावर हा संघ दोन्ही वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. २००४ मध्ये वेस्ट इंडिजने त्यांना दोन गड्यांनी आणि २०१३ मध्ये पाच धावांनी पराभूत केले होते. बांगलादेशच्या ढाका शहरात १९९८ साली पहिलीच स्पर्धा दक्षिण आफ्रिकेने जिंकली होती. प्रेक्षकांसाठी आनंदपर्वणी
वेळापत्रक जाहीर करताना आयसीसी
सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले, ‘‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी लहान स्पर्धा असली तरी प्रेक्षकांसाठी आनंदपर्वणी असेल.’’ २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पावसाच्या व्यत्ययात भारताने पाकला पराभूत केले होते. नंतर याच मैदानावर इंग्लंडला पाच धावांनी नमवित दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. त्याआधी द. आफ्रिकेत २००९ मध्ये पाकने भारताला सेंच्युरियन येथील सामन्यात ५४ धावांनी पराभूत केले होते.
स्पर्धा १ जून २०१७ मध्ये सुरू होणार आहे.
४ जून : भारत विरुद्ध पाकिस्तान, एजबेस्टन
८ जून : भारतविरुद्ध श्रीलंका, द ओव्हल
११ जून: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका, द ओव्हल