भारताच्या प्रज्ञानंदची विजयी घोडदौड, कारुआनाचा पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 21:39 IST2023-08-21T21:39:34+5:302023-08-21T21:39:58+5:30
R. Pragyanand : अजरबैजान येथील बाकू येथे सुरु असलेल्या विश्व कप स्पर्धेत भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याने विजय घोडदौड कायम राखत फिडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली

भारताच्या प्रज्ञानंदची विजयी घोडदौड, कारुआनाचा पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दिली धडक
अजरबैजान येथील बाकू येथे सुरु असलेल्या विश्व कप स्पर्धेत भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याने विजय घोडदौड कायम राखत फिडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. आज झालेल्या उपांत्य लढतीत प्रज्ञानंदने आपल्या बौद्धिक चातुर्याची चुणक दाखवत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या फॅबियानो कारुआनावर ३.५-२.५ असा विजय मिळवला. आता अंतिम फेरीत त्याची गाठ जागतिक क्रमवारीतील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याचे आव्हान असेल.
दरम्यान, आर प्रज्ञानंद याने मागील वर्षी बुद्धिबळाचा मास्टर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप भारताकडे खेचून आणली होती. त्यामुळे आताही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.