भारताची अचूक गोलंदाजी, न्युझीलंड ४ बाद ७५
By admin | Published: March 15, 2016 08:11 PM2016-03-15T20:11:04+5:302016-03-15T20:33:04+5:30
शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा न्युझीलंडने १४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा केल्या होत्या. न्युझीलंडकडून कोरी अॅन्डरसन (३३) आणि मिशेल सेंटनेर (३) धावावर नाबाद खेळत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत न्युझीलंडच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं आहे. भारतार्फे पहिल्याच षटकात आर अश्विनने धोकादायक मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले. तर दुसऱ्या षटकात अनुभवी नेहराने कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.
१० षटकाच्या खेळात सामन्यावर भारताने आपली पकड मजबूत केली होती. आर अश्विन, नेहराने आणि रैना यांनी प्रत्येकी एका गड्याला बाद केले होते. रैनाने रॉस टेलरला धावबाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. अश्विनने आपल्या ४ षटकात ३२ धावा खर्च करताना एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले.
न्युझीलंडकडून कर्णधार केन विल्यमस् (८) कॉलीन मुन्रो (७),मार्टीन गुप्टील (६), रॉस टेलर(१०) धावांचे योगदान दिले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा न्युझीलंडने १४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा केल्या होत्या. न्युझीलंडकडून कोरी अॅन्डरसन (३३) आणि मिशेल सेंटनेर (३) धावावर नाबाद खेळत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा
न्युझीलंड - केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, ल्यूक रोंची, रॉस टेलर, कॉलीन मुन्रो, मिशेल सेंटनेर,नाथन क्युलम, ग्रांट इलियट, टीम साउदी, ईश सोधी, कोरी अॅन्डरसन.