न्यूझीलंडविरोधी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, रहाणे उपकप्तान
By admin | Published: September 12, 2016 01:01 PM2016-09-12T13:01:05+5:302016-09-12T13:20:01+5:30
न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळल्या जाणा-या कसोटी मालिकेसाठी यजमान भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराला आणखी एक संधी देण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळल्या जाणा-या कसोटी मालिकेसाठी यजमान भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराला आणखी एक संधी देण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी संघाची घोषणा केली. येत्या २२ सप्टेंबरपासून ही कसोटी मालिका सुरू होणार आहे.
कसोटी सामन्यातील रोहितच्या निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवला असून वन-डे स्पेशालिस्ट रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळायला हवी असे मत त्याने मत मांडले होते. आघाडीच्या फळीतील अन्य एक फलंदाज चेतेश्वर पुजारावर नेहमी टांगती तलवार असते, मात्र न्युझीलंडविरोधात घरच्या मैदानावर होणा-या या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा, आर.अश्विन, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, अमित मिश्रा, उमेश यादव.
TEST squad - Virat (Capt), Rahul, Pujara, Rahane, Vijay, Rohit, Ashwin, Saha, Jadeja, Shami, Ishant, Bhuvi, Shikhar, Mishra, Umesh #INDvNZ
— BCCI (@BCCI) September 12, 2016