पाचव्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवला रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:19 AM2017-09-19T00:19:50+5:302017-09-19T00:29:32+5:30

तुर्कमेनिस्तान येथील अशागाबाट येथे सुरू झालेल्या पाचव्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले.

India's Sanjeevani Jadhav silver medal in the fifth Asian Indoor Games | पाचव्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवला रौप्यपदक

पाचव्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवला रौप्यपदक

Next


अशागाबाट, दि. 19 - तुर्कमेनिस्तान येथील अशागाबाट येथे सुरू झालेल्या पाचव्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. यूएईच्या अलिया मोहम्मदने सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. मूळची नाशिकची (महाराष्ट्र) असलेल्या संजीवनी जाधवने (महाराष्ट्राच्या) रौप्यपदक जिंकताना ९ मिनिटे २६.३४ सेकंदांची वेळ नोंदविली. प्रथम आलेल्या अलियाने ९ मि. २५.०३ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. चीनच्या वांग जीनयुला ९ मि. ५७.४३ सेकंदांची वेळ नोंदवून कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे भारताच्या पूर्णिमा हेमब्रमने पाच क्रीडाप्रकाराच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत ४०६२ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या लांब उडीप्रकारात भारताच्या नीना वराकीने ६.०४ मीटर लांब उडी मारून कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.

Web Title: India's Sanjeevani Jadhav silver medal in the fifth Asian Indoor Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.