कसोटी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
By admin | Published: February 24, 2016 03:13 PM2016-02-24T15:13:01+5:302016-02-24T15:13:01+5:30
न्यूझीलंडला २-० ने हरवून ऑस्ट्रेलियाने आयसीसी कसोटी कर्मवारीत पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. त्यामुळे भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
क्राइस्टचर्च, दि. २४ - न्यूझीलंडला २-० ने हरवून ऑस्ट्रेलियाने आयसीसी कसोटी कर्मवारीत पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. त्यामुळे भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना एकडाव आणि ५२ धावांनी जिंकला होता. तर दुसरा सामना ७ विकेटने जिंकत मालिका २-० ने खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने भारताला दूस-या स्थानावर ढकलत कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. २०१४ नंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आला आहे.
११२ गुणांसह ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर आहे तर भारत ११० गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. साऊथ आफ्रिका १०९ गुणासह तिसऱ्या, पाकिस्थान १०६ गुणासह चौथ्या तर इंग्लड १०२ गुणासह पाचव्या स्थानावर आहे.