भारताचा दुसरा सराव सामना आज

By admin | Published: March 12, 2016 03:19 AM2016-03-12T03:19:45+5:302016-03-12T03:19:45+5:30

टी-२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीत १५ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध सलामी लढतीला सामोरे जाण्याआधी भारतीय संघ आज, शनिवारी बलाढ्य द. आफ्रिकेशी दुसऱ्या सराव सामन्यात दोन हात करणार आहे.

India's second warm-up game today | भारताचा दुसरा सराव सामना आज

भारताचा दुसरा सराव सामना आज

Next

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीत १५ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध सलामी लढतीला सामोरे जाण्याआधी भारतीय संघ आज, शनिवारी बलाढ्य द. आफ्रिकेशी दुसऱ्या सराव सामन्यात दोन हात करणार आहे. भारतासाठी हा सामना वाटतो तितका सोपा नाही.
भारताने गेल्या ११ टी-२० पैकी १० सामने जिंकले. त्यात आॅस्ट्रेलियात यजमानांवर ३-० ने, लंकेवर २-१ ने मिळविलेल्या विजयांचा समावेश असून आशिया चषकातील लढतींचाही समावेश आहे. ढाका येथे सलग पाच सामने जिंकून टी-२० त आम्ही भक्कम असल्याचे भारतीय संघाने दाखवून दिले. भारतात भारताला पराभूत करणे कठीण असले तरी द. आफ्रिकेवर विजय मिळविणे सोपे नाही. याआधी आफ्रिकेने भारताला २-१ ने पराभूत केले होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा फॉर्म पाहता फलंदाजी ही भारतासाठी समस्या नाही. द. आफ्रिकेकडेही सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंची उणीव नाही.
गोलंदाजीत भारताकडे हरभजन आणि अश्विन हे अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. शिवाय मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. त्याने आशिष नेहरा आणि बुमराहसोबत मारा केला. रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, पवन नेगी हे देखील उपयुक्त मारा करू शकतात.
द. आफ्रिकेला मुख्य फेरीत १८ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा असल्याने भारताविरुद्ध कसून सराव करण्याचा पाहुण्यांचा इरादा असेल. या संघाने अद्याप विश्वचषक तसेच टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. हा संघ फायनलमध्येही पोहोचू शकला नाही. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक दिग्गज फलंदाज व गोलंदाज आहेत. याशिवाय अष्टपैलू ख्रिस मॉरिस, जेपी ड्यूमिनी आणि डेव्हिड व्हीसे हे मॅचविनर आहेत. वेगवान माऱ्याची जबाबदारी डेल स्टेन, कागिसो रबाडा, काइल एबोट व ख्रिस मॉरिस यांच्या खांद्यावर असेल. फिरकीसाठी इम्रान ताहिर आणि अ‍ॅरोन फार्गिसो हे दोन स्पेशालिस्ट खेळाडू संघात आहेत. (वृत्तसंस्था)
> भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, रवींद्र्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, हरभजनसिंग, पवन नेगी, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी.
दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), काइल एबोट, हाशिम अमला, फरहान बेहार्डियेन, क्वींटन डिकॉक, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, अ‍ॅरोन फागिंसो, कागिसो रबाडा, रिली रोसोयू , डेल स्टेन, इम्रान ताहिर, डेव्हिड व्हीसे.
> मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिका संघ यंदाच्या स्पर्धेत आपल्यावरील ‘चोकर’चा डाग पुसण्यासाठी खेळणार असल्याचे संकेत कर्णधार फाफ डू प्लेसिस याने दिले. आपल्या क्षमतेनुसार खेळाडूंची कामगिरी झाल्यास संघ जेतेपदाबरोबरच चोकर हा शब्द खोडू शकतो. आॅस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत आम्हाला १-२ने पराभव स्वीकारावा लागल्याने काहीशी निराशा आहे. मात्र, असे असले तरी संघाचा सर्वश्रेष्ठ खेळ झाल्यास जेतेपद नक्कीच पटकावू शकतो.

Web Title: India's second warm-up game today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.